'माझं पनवेल' हे नाव वाचताच प्रत्येकाला आपल्या पनवेलबद्दल अभिमान वाटतो - लोकनेते रामशेठ ठाकूर

    06-Nov-2026
 
 Majha Panvel Diwali Special Issue
 
पनवेल (Majha Panvel Diwali Special Issue) : पनवेल येथे प्रकाशित होणाऱ्या 'माझं पनवेल' वृत्तपत्राच्या १३ व्या दिवाळी विशेषांकाचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहात आणि पारदर्शक वातावरणात पार पडला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
 
या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी लोकनेते दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, 'माझं पनवेल'चे संपादक विशाल मनोहर सावंत, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, दीपक घोसाळकर, तसेच भाजपचे शहर उपाध्यक्ष केदार भगत, संतोष सुतार, मयूर तांबडे, संतोष भगत, अनिल कुरघोडे, सुनील पाटील, साबीर शेख, तुकाराम आवळे, रवींद्र गायकवाड, आशिष साबळे आदी मान्यवर उपस्थित होते. (Majha Panvel Diwali Special Issue)
 
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, "'माझं पनवेल' हे नाव वाचताच प्रत्येकाला आपल्या पनवेलबद्दल अभिमान वाटतो. 'माझं पनवेल' आहे म्हणजेच माझ्या पनवेलकरिता मी काहीतरी करायला पाहिजे, ही भावना यातून निर्माण होते. या दिवाळी अंकातून सर्वार्थाने चांगले लेख, कथा आणि विचार मांडले गेले आहेत." असे स्पष्ट करत त्यांनी 'माझं पनवेल'च्या १३ व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन झाल्याचे जाहीर केले. तसेच, वृत्तपत्राच्या आणि दिवाळी अंकाच्या संपूर्ण टीमला आगामी वाटचालीस व पुढील उपक्रमांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात. 'माझं पनवेल'च्या या अंकानिमित्त पनवेल परिसरातील साहित्यिक, पत्रकार आणि सामाजिक वर्तुळातून संपादक विशाल सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. (Majha Panvel Diwali Special Issue)




संबंधित मजकूर