राहुल गांधी हे ‘नकली संसद’ साकारतात; पण वास्तव संसदेत ते सरकारशी चर्चा करण्यास का तयार होत नाहीत? याचे कारण उघड आहे. आपण करीत असलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, हे त्यांना मनोमन ठाऊक असावे. म्हणूनच, वास्तवातील संसदेत आपण खोटे ठरू, याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. उलट देशात परकीय शक्तींचा हस्तक्षेप होत आहे; तो राहुल गांधींच्या माध्यमातून त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणीही झुकवू शकत नाही, हे आजवरच्या अनेक घटनांनी आता सिद्ध झाले आहे.
राहुल गांधी हे आपणच रचलेल्या सापळ्यात अलगद अडकत चालले आहेत. आपण केलेले आरोप आपल्यावरच उलटण्याची शक्यता दिसू लागल्यामुळे त्यांनी आता नवा पवित्रा घेतला आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशी ताकदींच्या मदतीने सत्तेवर आले असून, ते परदेशी ताकदींच्या इशार्यावर नाचतात,” असा नवा भन्नाट आरोप त्यांनी केला. १४० कोटींची लोकसंख्या असलेल्या देशात ८० कोटींहून अधिक मतदार आहेत. इतया सगळ्या मतदारांवर प्रभाव टाकून भारतात आपल्याला सोयीच्या व्यक्तीला सत्ता मिळवून देण्याची अद्भुत शक्ती जर या परया शक्तींकडे असेल, तर त्यांच्याशी कोणीच लढू शकणार नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी उगाच आपला वेळ वाया घालवू नये. दुसरे असे की, जर मोदी यांना या परकीय शक्तींनीच सत्तेवर बसविले असेल आणि मोदी हे त्यांच्या इशार्यावर काम करीत असतील, तर हा देश राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून त्यांना का सत्तेवरून दूर करतील?
शिवाय, मोदी हे आपल्याशी चर्चा करण्यास घाबरतात, असा आरोपही राहुल गांधी यांनी नुकताच केला. त्यांच्या या आरोपाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले असून, ‘एसआयआर’ किंवा अन्य कोणत्याही मुद्द्यावर सरकार विरोधी पक्षांशी संसदेत चर्चा करण्यास तयार आहे, असे शाह यांनी म्हटले आहे. पण, एकीकडे भारतात ‘लोकशाही खतरे में है’ असे सांगणारे राहुल गांधी लोकशाहीचे सर्वोच्च व्यासपीठ असलेल्या संसदेत चर्चा करण्यास का तयार नसतात, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. संसदेतील चर्चा आणि कामकाजाचे टीव्हीवर थेट प्रसारण होत असते. त्यामुळे तेथे आपला आवाज दाबला जातो, या राहुल गांधी यांच्या आरोपात तथ्य नसते, हे सार्या देशाला आजवर बरेचदा दिसून आले आहेच.
संसदेत उपस्थित राहायचे नाही, राहिले तरी तेथे गोंधळ घालून कामकाज चालू द्यायचे नाही आणि नंतर सभागृहाबाहेर येऊन सरकार आपल्याला बोलू देत नसल्याचा कांगावा करायचा, ही राहुल गांधींची ‘मोडस ऑपरेंडी’ आता देशाला कळून चुकली आहे. त्यामुळे हा दुटप्पीपणा यापुढे चालणार नाही. अर्थात, संसदेत आपल्या मनासारखे होत नसल्यामुळेच राहुल गांधींनी आता ‘नकली संसद’ (मॉक पार्लमेंट) भरविली होती आणि तेथे आपल्या मनासारखे निर्णय घेतले. हा प्रकार म्हणजे, लहान मुलांच्या भातुकलीसारखा होता. त्यात ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी!’
मोदी हे मतांची चोरी करून सत्तेवर आले आहेत, हा राहुल गांधी यांचा आवडता आरोप आहे. त्याचे कसलेही पुरावे त्यांनी आजवर दिलेले नाहीत. यासंदर्भात त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत आणि राष्ट्रपतींचीही भेट घेतली. राष्ट्रपतींनी त्यांच्याकडे ‘व्होटचोरी’च्या आरोपांचे मुद्दे मागितले असले, तरी ते देण्यास राहुल गांधी यांना अजून वेळ झालेला नाही. न्यायालयातही त्यांनी हे पुरावे दिलेले नाहीत. मग याचा अर्थ असाच की, राहुल गांधी यांच्या हाती नेहमीप्रमाणे यंदाही काहीही नाहीच!
मोदी हे देशाचे पंतप्रधान असून, ते जेव्हा परदेशी जातात, तेव्हा ते अधिकृत सरकारी दौर्यावर असतात. तेथे ते कोणत्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आणि कोणत्या नेत्यांना भेटणार, याचे वेळापत्रक कितीतरी महिने आधीच तयार असते आणि मोदी यांचे कार्यक्रमही त्यानुसारच पार पाडले जातात. शिवाय, या नेत्यांशी झालेल्या चर्चेत काय ठरले, कोणत्या विषयावर चर्चा झाली, याचे इतिवृत्तही अधिकृतरीत्या नोंदले जाते. त्यामुळे मोदी यांचे परदेश दौरे हे गुप्त नसतात, तर पारदर्शक असतात. उलट राहुल गांधी हेच गुप्तपणे परदेशात जात असतात. ते नेमके कोणत्या देशात गेले आहेत आणि कधी परतणार, याची माहिती त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनाही नसते. कधी ते कोलंबियात जातात, तर कधी व्हिएतनाममध्ये. कधी युरोपातील देशांत जातात, तर कधी ब्रिटनमध्ये. अमेरिकेतही जातात. पण, परदेशात ते कोणाची भेट घेतात, कशावर चर्चा करतात, त्यांना तेथे कोण आमंत्रित करते आणि या दौर्यांचा खर्च कोण करते, यांपैकी कशाचीच माहिती राहुल गांधी यांनी आजवर दिलेली नाही (अर्थात, सरकारकडे याची माहिती नसेल, हे संभवत नाही. पण, सरकारने याबाबत आजपर्यंत गुप्तता बाळगली आहे. त्याची कारणे काहीही असतील. असो.). चीनच्या ‘कम्युनिस्ट’ पक्षाशी काँग्रेसने कसला करार केला आहे, त्याचा तपशील आजवर ना काँग्रेसने सांगितला, ना राहुल किंवा सोनिया गांधी यांनी सांगितला.
राहुल गांधी हे देशातील विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांना विशेष सुरक्षा व्यवस्थाही प्रदान केलेली आहे. मात्र, या सुरक्षाव्यवस्थेलाही ते आपल्या परदेश दौर्यांची माहिती देत नाहीत. शिवाय, जवळपास दर महिन्याला त्यांना परदेशात का जावे लागते, हे गूढच. तेथे जाण्याचा खर्च ते कसा करतात, हे जनतेला समजणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच राहुल गांधी यांच्या या गूढ परदेश दौर्यांचा उल्लेख केल्यामुळे राहुल गांधी मनोमन घाबरले असावेत. मोदी यांचे आरोप आपल्यावर शेकू नयेत आणि आपले बिंग फुटू नये, म्हणूनच त्यांनी मोदी हेच परदेशी शक्तींच्या तालावर नाचतात, परकीय शक्तींच्या मदतीने ते सत्तेवर आले आहेत, असा नवा आरोप केला असावा. परकीय शक्तींचा हस्तक्षेप देशात होत असेल, तर तो राहुल गांधी यांच्या माध्यमातूनच होत आहे. देशातील घटनात्मक संस्थांबाबत जनतेत अविश्वास व संशय निर्माण करून देशात अराजकता माजविण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्यात राहुल गांधी यांचा (आणि त्यांच्या परदेशी दौर्यांचा) सक्रिय सहभाग आहे. याची सरकारने गंभीर दखल घेतली असल्यानेच, राहुल गांधी यांनी आता परकीय शक्तींवरून मोदी यांच्यावर उलटा आरोप केला असावा. पण, शेवटी या सगळ्याचा उपयोग शून्यच!
लेखक- राहुल बोरगांवकर