मुंबई, (NSE Q2 Results FY27) : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिमाहीत एनएसईचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक तुलनेत २३ टक्क्यांनी वाढून ₹२,५७८ कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत हा नफा ₹२,०९८ कोटी होता.
कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्न ९ टक्क्यांनी वाढून ₹४,५५४ कोटी झाले, तर ऑपरेटिंग EBITDA मध्ये १०७ टक्क्यांची वाढ होऊन तो ₹३,०७९ कोटींवर पोहोचला. या तिमाहीत EBITDA मार्जिन ७६ टक्के नोंदवण्यात आले. व्यवहार शुल्कातून मिळणारे उत्पन्न ९ टक्क्यांनी वाढून ₹३,०३५ कोटी झाले.
आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या सहामाहीत एनएसईचे एकत्रित उत्पन्न ₹९,८०७ कोटी, तर निव्वळ नफा १३ टक्क्यांनी वाढून ₹५,६९८ कोटी झाला. याच कालावधीत केंद्र व राज्य सरकारच्या तिजोरीत एनएसईचे एकूण योगदान ₹४१,२३४ कोटी राहिले, अशी माहिती कंपनीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.