मुंबई, : (Nitesh Rane Youth Shankhnaad)देशाची एकता, संविधानिक मूल्ये आणि सांस्कृतिक अस्मिता जपण्याची मोठी जबाबदारी देशातील तरुणांवर आहे. आपल्या देशात ‘जय श्रीराम’ म्हणण्यापासून रोखण्याचे प्रयत्न होत असतील, तर अशा प्रवृत्तींना वेळीच रोखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले.
भारतीय जनता युवा मोर्चा, नागपूर महानगरच्या वतीने ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत आयोजित ‘युवा शंखनाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी तरुणांशी संवाद साधत देशाचे संरक्षण, धार्मिक स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक परंपरांच्या जतनासाठी युवकांनी संघटित होण्याचे आवाहन केले.(Nitesh Rane Youth Shankhnaad)
एकसंघ भारताकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस करू नये, यासाठी देशाच्या संरक्षणाची मोठी जबाबदारी तरुणांनी स्वीकारली पाहिजे. आज काही समाजकंटकांकडून देशात अराजकता पसरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला बाधा पोहोचविण्याचे प्रयत्नही काही घटकांकडून होत असल्याचा आरोप राणे यांनी केला. ही लढाई केवळ विचारांची नसून देशाची एकता, संविधानिक मूल्ये आणि सांस्कृतिक अस्मिता जपण्याची आहे, असे ते म्हणाले.
आपण वेळीच जागरूक राहिलो नाही, तर भविष्यात आपल्या धार्मिक स्वातंत्र्यावरही गदा येऊ शकते. त्यामुळे धर्म, संस्कृती आणि परंपरांच्या रक्षणासाठी देशातील तरुणांनी सक्षमपणे पुढे येण्याची गरज आहे. धर्मरक्षण आणि राष्ट्रहितासाठी युवकांनी संघटित होऊन सकारात्मक आणि जागरूक भूमिका बजावावी. समाजात एकजुटीचा आणि जागरूकतेचा संदेश पोहोचविण्याचे काम तरुणांनी करावे, असे आवाहनही राणे यांनी केले.(Nitesh Rane Youth Shankhnaad)
या कार्यक्रमाला आमदार परिणय फुके, भाजपा नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, नागपूरच्या महापौर सौ. ठाकरे, आमदार खोपडे, विदर्भ संघटन प्रमुख कोठेकर, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार गिरीश व्यास, आमदार पोतदार, स्थायी समिती अध्यक्ष सौ. शिवानी दाणी, भाजयुमो नागपूर महानगर अध्यक्ष सचिन करारे, महामंत्री रितेश पांडे, अथर्व त्रिवेदी, रिषभ अरखेल, कुलदीप माटे आणि संपर्क महामंत्री नागेश साठवणे यांच्यासह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.(Nitesh Rane Youth Shankhnaad)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.