
मुंबई - Eetha Ramayana: Part 1या दिवाळीत प्रेक्षकांसाठी असणार आहे एक खास सिनेमॅटिक मेजवानी! श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ईथा’ या चित्रपटाचा ट्रेलर ‘रामायण’सोबत चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात येणार आहे. म्हणजेच, भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाशी नातं सांगणाऱ्या दोन असामान्य कथा यंदाच्या सणासुदीच्या काळात एकाच वेळी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.
एका बाजूला आहे पिढ्यान् पिढ्या प्रेक्षकांना प्रेरणा देणारी अजरामर महागाथा ‘रामायण’, तर दुसऱ्या बाजूला आहे ‘ईथा’चा प्रेरणादायी प्रवास! अनेक संकटांवर आणि अडथळ्यांवर मात करत स्वतःच्या कलेच्या जोरावर एक दिग्गज कलाकार म्हणून नाव कमावणाऱ्या ईथाची ही कहाणी आहे.Eetha Ramayana: Part 1
या फेस्टिव्ह सीझनमध्ये या दोन कथांचा एकत्रित अनुभव म्हणजे सिनेप्रेमींसाठी मनोरंजनाची जणू डबल ट्रीटच! एकीकडे भारतीय पौराणिक परंपरेचा गौरव, तर दुसरीकडे भारतीय कलेचा, संघर्षाचा आणि जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास. अशा अनोख्या अंदाजात दोन्ही कथा भारताच्या समृद्ध कथाकथन परंपरेचा सन्मान करणार आहेत.Eetha Ramayana: Part 1
‘ईथा’ 4 डिसेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.Eetha Ramayana: Part 1