‘औरंगजेबाचा इतिहास प्रत्यक्षात कसा पुसणार?’ असा विखारी सवाल करत, ‘एमआयएम’ची नगरसेविका सहर शेख हिने क्रूरकर्मा औरंग्याचे उदात्तीकरण केले. संविधानाची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या मातीत मुघलांची भलामण करणार्या या प्रवृत्तींची लायकी नेमकेपणाने ओळखून, त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे!
औरंगजेबाचे महत्त्व पुसणारे कितीही चित्रपट आले किंवा त्याची बदनामी झाली; तरी काहीही फरक पडत नाही. इतिहास पुस्तकातून काढू शकाल; पण प्रत्यक्षातील इतिहास कसा काढणार?” असे विखारी विधान मुंब्र्यातील नगरसेविका सहर शेखने केले. इतकेच नव्हे, तर ज्या औरंगजेबाने लाखो हिंदूंचे रक्त सांडले, त्याला ‘मलिक उल हिंद’वर राज्य करणारा सम्राट, असे चक्क गौरवान्वित करीत तिने वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. अशी ही औरंग्याप्रेमी सहर शेख ठाणे महापालिकेत मुंब्र्यातून निवडून आलेली ‘एमआयएम’ची नगरसेविका. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर, ‘मुंब्रा हिरवा करून टाकायचा आहे,’ असे तारे तिनेच तोडले होते. ठाण्याच्या जितूमियाँला ‘कैसे हराया’ म्हणून हिनेच हिणवले होते. अशा या मुस्लीम मतपेढीच्या जोरावर जिंकून आलेल्या सहरचा आदर्शही म्हणूनच औरंग्या!
मुळात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहून, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर अशी देशविरोधी भाषा बोलण्याचे या सहरसारख्यांचे धाडस होतेच कसे? त्यामुळे ऐन दिवाळीच्या प्रारंभी हिंदूंच्या भावना मुद्दाम दुखावून समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचाच हा अत्यंत विकृत असाच प्रकार. एकट्या सहरलाच नाही, तर या निजामशाहीचा हिरवा वारसा चालवणार्या या पक्षाच्या नेत्यांना देशापेक्षा शेवटी आपला ‘महजब’च महत्त्वाचा. कारण, मदरशांमध्ये आणि धार्मिक सभांमध्ये भारताचा खरा इतिहास यांना शिकवलाच जात नाही. उलट, ‘औरंगजेब’ आणि ‘निजाम’ हेच त्यांचे ‘हिरो’ असेच त्यांच्या मनावर बिंबवले जाते आणि परिणामस्वरुप क्रूरकर्मा औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचे असे हिडीस प्रकार करण्यापर्यंत यांची मजल जाते.
वास्तविक पाहता, औरंगजेबाचा संपूर्ण इतिहासच पराकोटीची धार्मिक असहिष्णुता, पाशवी क्रूरता आणि अनन्वित छळानेच बरबटलेला! मुघल दरबारातील ‘मासिर-ई-आलमगिरी’ या नोंदीनुसार, औरंगजेबाने संपूर्ण भारतात पद्धतशीरपणे हिंदूंची धार्मिकस्थळे उद्ध्वस्त करण्याचे फर्मान सोडले होते. त्याच्या कारकिर्दीत राजस्थानमध्ये ३०८हून अधिक प्रमुख मंदिरे जमीनदोस्त करण्यात आली. १६६९ मध्ये काशीचे विश्वनाथ मंदिर आणि १६७० मध्ये मथुरेचे ऐतिहासिक केशवराय मंदिर उद्ध्वस्त करून तिथे मशिदी उभारल्या गेल्या आणि तिथल्या मूर्ती हिंदूंच्या भावना चिरडण्यासाठी आग्रा मशिदीच्या पायर्यांखाली गाडण्यात आल्या. हिंदू प्रजेला आर्थिकदृष्ट्या कंगाल करण्यासाठी आणि सक्तीच्या धर्मांतरासाठी जाचक असा ‘जिझिया’ करही लादणारा हाच जालीम औरंग्या! हा कर भरताना गरीब हिंदूंना पाशवी अत्याचारांना सामोरे जावे लागले आणि याच पैशातून औरंग्याने स्वतःची क्रूर लष्करी मोहीमही राबवली. अशाच धर्मांधतेच्या अतिरेकातून औरंगजेबाने शिखांचे नववे गुरू तेग बहादूर यांचीही दिल्लीत अत्यंत अमानुषपणे हत्या केली. तसेच महाराष्ट्रात स्वराज्य रक्षणासाठी अहोरात्र लढणार्या छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने पकडल्यानंतर त्यांचे डोळे काढणे, जीभ छाटणे, नखे काढणे आणि अंगावरील त्वचेचे अक्षरश: हाल हाल करून अत्यंत क्रूरपणे त्यांचा छळ करुन हत्या केली. इतिहासकारांच्या मते, औरंगजेबाच्या ४९ वर्षांच्या कारकिर्दीत आणि विशेषतः २५ वर्षे चाललेल्या दख्खनच्या प्रदीर्घ युद्धांमध्ये, धार्मिक संघर्ष, उपासमार आणि आक्रमणांमुळे सुमारे ४५ लाख नागरिकांना आणि सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. अशा राक्षसी नराधमाचे उदात्तीकरण करणे म्हणजे, लाखो देशप्रेमींच्या बलिदानावर मीठ चोळण्यासारखेच! त्यामुळे आजचे हे ‘कौमवाले’ नेते लोकशाहीच्या बुरख्याआडून, याच क्रूर इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची स्वप्ने पाहात आहेत काय, असाच प्रश्न पडल्याखेरीज राहत नाही.
ज्या ‘औरंगाबाद’चे नामकरण औरंग्याच्या नावावरून केले गेले होते, तो औरंग्या राज्यातील जनतेवर अत्याचार करण्यासाठी आणि महिलांची विटंबना करण्यासाठीच महाराष्ट्रात आला होता, हा कधीही पुसून न टाकता येणारा काळा इतिहास. ज्या देवगिरी किल्ल्याजवळ औरंग्याचे थडगे आहे, त्या देवगिरीचा तेजस्वी इतिहासही यानिमित्ताने थोडक्यात समजून घ्यायला हवा. देवगिरी किल्ला म्हणजे, छत्रपती संभाजीनगरजवळील अत्यंत प्राचीन आणि भव्य वास्तू. १२व्या शतकात यादव घराण्याने हा किल्ला बांधला आणि शतकानुशतके तो अभेद्य राहिला. नवव्या ते चौदाव्या शतकाच्या पूर्वार्धात देवगिरी ही यादवांची राजधानी. १३०८ मध्ये अलाउद्दीन खिलजीने फितुरीने हे शहर ताब्यात घेतले आणि तुघलकने त्याचे नामकरण ‘दौलताबाद’ असे केले. या मुस्लीम आक्रमणकर्त्यांनी आणि नंतर औरंग्याने महाराष्ट्रात महिलांवर अनन्वित असे अत्याचार केले. याच अन्याय आणि अत्याचारांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. छत्रपती शिवरायांचा हा तेजस्वी इतिहास म्हणूनच आपणही स्मरणात ठेवावा आणि पुढील सर्व पिढ्यांवर त्याचे संस्कार करावेत, अन्यथा सहर शेखसारख्या कुप्रवृत्ती औरंग्याची भलामण करत, त्याची महती गायला टपून बसलेल्याच आहेतच. मविआ आघाडीतील नेत्यांनीही याच औरंग्याच्या कबरीवर डोके टेकवण्यात, फुले वाहण्यात धन्यता मानली होती. कारण, त्यांना फक्त दाढी कुरवाळत, स्वतःच्या मतांची बेगमी करायची आहे. ही वाचाळ सहरही त्याच कंपूतली आणि तीच नाही, तर तिच्यासारख्या अशा हजारो औरंग्याच्या अनौरस औलादी आजही महाराष्ट्रात शिल्लक आहेत, असे म्हणूनच दुर्दैवाने म्हणावे लागते.
याच औलादींना औरंग्याचा असा एकाएकी उमाळा येतो. भारतभूमीतील निष्पाप हिंदूंच्या रक्ताचे घोट घेणार्या मुघल सल्तनीचा इतिहास सहरसारख्या धर्मांधांना आदर्शवत वाटतो. पण, सहर म्हणते तसे चित्रपटांमधून औरंग्याविरोधात कोणताही ‘प्रपोगंडा’ चालवला जात नसून, या क्रूर मुघलांचे वर्षानुवर्षे मुद्दाम दडवून ठेवलेले काळे वास्तवच जगासमोर आणले जात आहे. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसने तुष्टीकरणाच्या आणि दाढी-कुरवाळू राजकारणासाठी पुस्तकांमध्ये मुघलांचा खोटा इतिहास घुसवला होता, तो आता केंद्र सरकारने हटवलाच. पण, आज गरज आहे, ती असे विखारी धार्मिक विचारांची पेरणी करणार्या मदरशांवरही कठोर निर्बंधांची. सोबतच समान नागरी कायदा, बहुपत्नीत्वावर बंदी आणि लोकसंख्या नियंत्रण ही काळाची नितांत गरज. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी ही पावले उचलणे अपरिहार्य झाले आहे. खरं तर याच सहर शेखने महापालिकेची निवडणूक लढवताना संविधानाची शपथ घेतली होती. तेव्हा, संविधानाला सर्वोपरि मानून मुंब्र्यातील जनतेच्या पाणी, रस्ते, आरोग्य अशा मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे. पण, ते जमत नसेल आणि मुघलांचीच अशी भलामण करायची असेल, तर तिने सरळ ५३ पैकी एखाद्या इस्लामिक देशाची वाट धरावी आणि मुघली प्रवृत्तीच्या राजवटींमध्ये मुस्लीम महिलांचे स्थान काय आहे, त्याचाही जरा अभ्यास करावा.
खरं तर हे सगळे प्रकार आजचे नाहीच. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि वैचारिक भूमीवर मुघली विचारसरणीची बीजे रुजवून वातावरण कलुषित करण्याचे पातक पद्धतशीर सुरू आहे. पण, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा विसर पाडत, अशा नराधमांचे उदात्तीकरण कोणत्याही परिस्थितीत कदापि सहन केले जाणार नाही. त्यामुळे सहर ही केवळ एक व्यक्ती नसून, ती विकृत राजकारणातील अत्यंत घातक प्रवृत्ती आहे. अशा या धर्मांधांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे औरंग्याचे थडगे हे याच महाराष्ट्राच्या मातीत आहे. तो इथेच खपला आणि इथेच गाडला गेला. त्याचे हे थडगे, त्याच्या क्रूरतेचे आणि पराभवाचेच प्रतीक! आज छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राकडे किंवा हिंदूंकडे जो कोणी वाकड्या नजरेने बघेल, त्याचीही अवस्था त्या औरंग्यासारखीच मातीत मिळाल्याशिवाय राहणार नाही. औरंगजेबासारख्या क्रूर राज्यकर्त्याला ‘नायक’, ‘मसिहा’ ठरवण्याचा धर्मांधांचा असा कोणताही प्रयत्न या शिवछत्रपतींच्या भूमीत ना कधी यशस्वी झाला आणि पुढेही होणार नाही, ही सह्याद्रीच्या काळ्या दगडावरची रेघ!