विलेपार्लेतील सोसायटीत Watercock पक्ष्याचे दुर्मिळ दर्शन

    04-Nov-2026

watercock bird


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
मुंबईच्या गजबजलेल्या शहरी वस्तीत वन्यजीवांचे दर्शन होणे ही नेहमीच कुतूहलाची बाब असते. विलेपार्ले येथील एका सोसायटीच्या आवारात नुकताच वॉटरकॉक (Watercock) या पाणपक्ष्याचा वावर आढळून आला (watercock bird). सोसायटीमधील एका गाडीखाली या पक्ष्याची मादी बसलेली घाबरलेल्या अवस्थेत बसल्याचे पक्षीनिरीक्षक अजय नाडकर्णी यांच्या निदर्शनास आले (watercock bird). त्यांनी प्रसंगावधान राखत या पक्ष्याला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्यानंतर वृंदार हुपरीकर यांच्या मदतीने आरे येथील तलावात त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले (watercock bird). मुंबईच्या शहरी भागात तुलनेने कमी दिसणाऱ्या या पक्ष्याच्या दर्शनामुळे पक्षीप्रेमींमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. (watercock bird)

 

वॉटरकॉक (Gallicrex cinerea) हा रेल (Rallidae) कुळातील पाणपक्षी असून त्याला मराठीत 'पाणकोंबडा' असेही म्हणतात. प्रामुख्याने गोड्या पाणथळ जागा, दलदलीचे प्रदेश, गवताळ पाणथळ अधिवास आणि दाट जलवनस्पती असलेल्या तलावांच्या परिसरात हा पक्षी आढळतो. पाणथळ जागांमधील उंच गवत आणि वनस्पतींच्या आड लपून राहण्याची त्याची सवय असल्याने तो सहज नजरेस पडत नाही. त्यामुळे त्याचे प्रत्यक्ष दर्शन तुलनेने दुर्मीळ ठरते. वॉटरकॉकच्या नर आणि मादीमध्ये रंगरूपाच्या बाबतीत स्पष्ट फरक दिसतो. प्रजनन काळातील प्रौढ नराचा रंग प्रामुख्याने काळसर राखाडी असतो. त्याची चोच पिवळी, तर कपाळावरील ढाल आणि पाय लाल रंगाचे असतात. याउलट मादीचा रंग तपकिरी, पिवळसर आणि गडद रेषांनी युक्त असतो. तरुण पक्ष्यांचे रंगरूपही मादीसारखे असते. हा पक्षी साधारण ३६ ते ४३ सेंमी लांबीचा असतो.

 

वॉटरकॉक हा भारतात आढळणारा पक्षी असून त्याची नोंद केवळ ईशान्य भारतापुरती मर्यादित नाही. त्यामुळे मुंबईत या पक्ष्याचे दर्शन पूर्णपणे अनपेक्षित नसले, तरी विलेपार्लेसारख्या दाट शहरी भागातील सोसायटीच्या आवारात त्याचा आढळ होणे ही लक्षवेधी घटना आहे. विलेपार्लेतील या घटनेमुळे शहरांमधील पाणथळ अधिवासांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. केवळ तलाव आणि खाड्याच नव्हे, तर त्यांना जोडून असलेली गवताळ आणि दलदलीची छोटी अधिवासक्षेत्रेही अनेक पक्ष्यांसाठी महत्त्वाची असतात. अशा पक्ष्यांचे दर्शन झाल्यास त्यांना पकडण्याचा किंवा स्वतःहून हाताळण्याचा प्रयत्न न करता वन विभाग अथवा प्रशिक्षित वन्यजीव बचाव पथकाची मदत घेणे आवश्यक आहे.






संबंधित मजकूर