मुंबई हौसिंग फेडरेशन निवडणुकीत; सहकार पॅनेल’ने निर्विवाद बहुमत

हौसिंग फेडरेशनच्या इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध निवड

 
Mumbai Housing Federation Election
 
मुंबई (Mumbai Housing Federation Election): महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, मुंबई बँकेचे संचालक आ. प्रसाद लाड, नंदकुमार काटकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मुंबई हौसिंग फेडरेशनच्या निवडणुकीत ‘सहकार पॅनेल’ने निर्विवाद बहुमत मिळाले आहे. इतिहासात पहिल्यांदाच मुंबई हौसिंग फेडरेशनची निवडणूक बिनविरोध झाली असून फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर यांच्या नेतृत्वावर मुंबईकरांनी विश्वास ठेवल्याचे दिसून आले आहे.
 
या निवडणुकीत सर्वसाधारण मतदार संघातून अजय बागल, हेमंत दळवी, प्रकाश दरेकर, शाम दरेकर, मुकेश घुमरे, आशिष गोयल, ज्ञानेश्वर महाजन, विशाल कडणे, आनंद माईंगडे, विजय पवार, व्यंकटेश सामंत, विष्णू सावळ, यशवंत सावंत, विजय शेलार, वसंत शिंदे, दत्तात्रय वडेर हे तर महिला राखीव मतदार संघातून ऍड. शुभांगी सारंग, सविता झेंडे, अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदार संघातून प्रमोद तायडे, इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून सुहास आडिवरेकर आणि भटक्या विमुक्त जाती-जमाती राखीव व विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातून ज्ञानेश्वर गोसावी हे २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान, बिनविरोध निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे आमदार प्रवीण दरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (Mumbai Housing Federation Election)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर