‘एसएफसी एनव्हायरमेंटल टेक्नोलॉजीज’चे शेअर बाजारात लिस्टींग; बाजार खुला होताच शेअरची २९.१२ टक्क्यांची उसळी!

    03-Nov-2026   
 
SFC Environmental Technologies Share Listing
 
मुंबई (SFC Environmental Technologies Share Listing): पर्यावरण तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून लौकिक असलेल्या ‘एसएफसी एनव्हायलमेंटल टेक्नॉलोजीज लिमिटेड’चा आयपीओ लिस्टींग समारंभ एनएसई मुंबई येथे दि. ३ नोव्हेंबर रोजी पार पडला. बाजारात लिंस्टींगनंतर कंपनीच्या शेअरने २९.१२ टक्क्यांनी उसळी घेतली तर सात टक्के प्रिमिअमवर खुला झाला. दिवसअखेर तो ४२६.१० अंकावर बंद झाला. ‘एसएफसी’ ही शेअर बाजारात नोंदणीकृत असलेली एकमेवर सांडपाणी प्रक्रिया करणारी भारतीय कंपनी ठरली आहे. या प्रसंगी, कंपनीचे अध्यक्ष संदीप असोलकर, कार्यकारी संचालिका प्रचिती असोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
प्रचिती आसोलकर म्हणाल्या, “माझे वडिल संदीप असोलकर यांचे अभियांत्रिकी क्षेत्र असूनही त्यांनी पर्यावरण क्षेत्रात काम करण्याचा धाडसी निर्णय घेतला हा पहिला योगायोग. २००४मध्ये त्यांनी १ लाख रुपयांच्या भांडवलावर मोठे स्वप्न उराशी बाळगत सात मित्रांच्या सोबतीने ‘सी-टेक’ तंत्रज्ञान भारतात आणले. हा दुसरा योगायोग. भारतीय नद्यांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी आणि नद्यांची अवस्था आपण काही वर्षांपूर्वी पाहतच होतो. सांडपाणी प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान योग्य वेळी, योग्य जागी आणि योग्य किंमतीत भारतात आले. आज एसएफसीकडे ७५०० दशलक्ष लीटर प्रतिदिन जलशुद्धीकरणाची क्षमता असलेले सातशेहून जास्त सी-टेक प्लांट कार्यरत आहेत. गेल्या २० वर्षांत भारतातील ८० टक्के सिक्वेन्सिंग बॅच रिएक्टर (एसबीआर) व्यावसाय आमच्याकडे आहे.” (SFC Environmental Technologies Share Listing)
 
“एका ऑस्ट्रीयन कंपनीला १ दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी करण्याचा निर्णय वडिलांनी घेतला. या नंतर अवघ्या सहा महिन्यांत आम्हाला दोन प्रकल्पांचे काम मिळाले. याच दरम्यान २०१६मध्ये एका महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रियेचे काम आम्ही हाती घेतले. पण, विदेशी मॅन्युअलवर हा प्रकल्प चालविणे कठीण जात होते. त्यामुळे पुढील पाच वर्षांत आपण स्वतःची यंत्रणा उभी करू शकलो. गेली दहा वर्षे आपण हा प्रकल्प यशस्वीपणे चालवत आहोत, त्यामुळे आता आपली स्वतःची यंत्रणा उभी राहिली. पुढील काही वर्षात केंद्र सरकारने बायोगॅस निर्मितीच्या प्रोत्साहनासाठी ‘सतत योजना’ आणली. देशाला अशा प्रकारच्या बायोगॅस निर्मितीतील कंपन्यांची गरज होती. गेली २० वर्षे आम्ही सांडपाणी पुर्नवापर प्रक्रियेत आहोत, भविष्यात ते पुर्नवापरायोग्य बनविले जावे यासाठी काम करित राहू. आजच्या क्षणासाठी मी आमचे सर्व गुंतवणूकदार, कर्मचारी, ग्राहक, हितचिंतकांचे आभारी आहे.” असेही त्या म्हणाल्या. (SFC Environmental Technologies Share Listing)
 
‘एसएफसी’च्या शेअर बाजारातील नोंदणी प्रक्रियेद्वारे स्वावलंबीच बनली नाही तर जागतिक पातळीवर भारताला आत्मनिर्भरतेकडे नेण्याची वाटचाल करित आहे. भारतीय भांडवली बाजार गेल्या काही वर्षात जगातील अग्रगण्य आयपीओ बाजार म्हणून उदयास आला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात ८९ कंपन्यांनी १.२ लाख कोटी रुपयांच्या निधीची उभारणी केली आहे. - क्रिष्णन अय्यर, हेड इश्यूअर रिलेशन्स, प्रोडक्ट अँड बिझनेस डेव्हलपमेंट (SFC Environmental Technologies Share Listing)
 
बाजार उघडताच शेअरची उसळी
 
एसएफसी एनव्हायमेंटल टेक्नॉलॉजीजचा आयपीओ बाजारात लिस्टींग झाल्यानंतर शेअरने अवघ्या काही सेकंदाचत सात टक्क्यांची उसळी घेतली. प्रतिशेअर ९६.१० रुपयांच्या वाढीसह तो ४२६.१० अंकावर बंद झाला. आयपीओमध्ये एकूण ४५ शेअर्सच्या लॉटची प्रति शेअर ३३० रुपये किंमत होती. पहिल्याच दिवशी या शेअरने गुंतवणूकदारांना २९ टक्क्यांचा परतावा दिला.  (SFC Environmental Technologies Share Listing)
 
 




तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक. 

संबंधित मजकूर