_202611031816400331.jpg)
मुंबई (विशेष प्रतिनिधी ) - ramayanm ranbir kapoor yash रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित ‘रामायण : पार्ट वन’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. उद्या हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, भारतातील तिकीट विक्रीपासून ते परदेशातील प्रीमियर शोजपर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी आघाडी घेतली आहे.चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच १०० कोटींचा टप्पा पार केलाय. दिवाळीच्या आधी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना सहसा मिळणारा मर्यादित प्रतिसाद लक्षात घेता ‘रामायण’ची ही घोडदौड विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
Sacnilk च्या आकडेवारीनुसार, ‘रामायण’ने भारतात अॅडव्हान्स बुकिंगमधून सुमारे ७५.५६ कोटी रुपयांचा ग्रॉस व्यवसाय नोंदवला आहे. या आकडेवारीत ब्लॉक केलेल्या सीट्सचाही समावेश आहे. त्याव्यतिरिक्त सुमारे १९.१३ लाख तिकिटांची आगाऊ विक्री झाल्याची नोंद आहे. ब्लॉक केलेल्या सीट्स वगळल्यास हा आकडा ६०.०९ कोटी रुपये आणि तिकीट विक्री १५.२२ लाख इतकी आहे. भारत आणि परदेशातील आगाऊ बुकिंगचा एकत्रित आकडा १०५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. उत्तर अमेरिकेतही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून प्रीमियर शोजसाठी मोठ्या प्रमाणात तिकिटांची विक्री झाली आहे.ramayanm ranbir kapoor yash
चित्रपटगृहांच्या साखळीमध्येही ‘रामायण’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. PVR INOXमध्येच चार लाखांहून अधिक तिकिटांची आगाऊ विक्री झाली आहे. साधारणतः 10 लाखांपर्यंत तिकीटविक्री झाल्याचा अंदाज वर्तविला जातोय. अॅडव्हान्स बुकिंगमधील आकडे पाहता ‘रामायण’कडून मोठ्या ओपनिंगची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, केवळ पहिल्या दिवसासाठीच नव्हे, तर शुक्रवार, शनिवार आणि रविवारच्या शोसाठीही प्रेक्षकांकडून आगाऊ तिकिटे बुक केली जात आहेत.मात्र, प्रत्यक्ष पहिल्या दिवसाचे कलेक्शन, प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि चित्रपटाला मिळणाऱ्या तोंडी प्रसिद्धीवर पुढील बॉक्स ऑफिसची घोडदौड अवलंबून असेल.ramayanm ranbir kapoor yash
चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला मिळणारा प्रतिसाद पाहता देशातील अनेक शहरांमध्ये पहाटेचे शो आयोजित करण्यात आले आहेत. काही चित्रपटगृहांनी सकाळी ६ वाजताचे शो ठेवले असून, मुंबईतही सकाळी लवकर चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. तसेच काही काही चित्रपटगृहांमध्ये मध्यरात्रीचे शो हि ठेवण्यात आले आहेत.ramayanm ranbir kapoor yash
‘रामायण’ हा भव्यदिव्य स्वरूपात तयार करण्यात आलेला चित्रपट असल्याने IMAX 3D, 4DX आणि अन्य प्रीमियम फॉरमॅटमध्ये तो प्रदर्शित होणार आहे. या फॉरमॅटमधील मोठ्या स्क्रीनचा अनुभव आणि प्रीमियम आसनव्यवस्था यामुळे तिकीटदर सामान्य शोच्या तुलनेत अधिक आहेत.एका बाजूला चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आणि दुसऱ्या बाजूला वाढलेले तिकीटदर, अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे. कुटुंबासह चित्रपट पाहण्यासाठी जाणाऱ्या प्रेक्षकांना तिकिटांवर मोठा खर्च करावा लागू शकतो. त्यात ऑनलाइन बुकिंगचे अतिरिक्त सुविधा शुल्क आणि कर यांचीही भर पडते.‘रामायण’सारख्या भव्य चित्रपटाचा अनुभव मोठ्या पडद्यावर घेण्याची इच्छा अनेकांना आहे. मात्र, सामान्य चित्रपटांच्या तुलनेत एवढे जास्त पैसे मोजणे सर्वसामान्य प्रेक्षकांना कितपत परवडणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.ramayanm ranbir kapoor yash