
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - Jai Shri Ram Pravin Tardeअयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर उभं राहिलं आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये घडली एक अशी घटना,जिने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं! नेमकं काय घडलं होतं? या चित्तथरारक घटनेमागची कहाणी काय आहे? अशाच अनेक प्रश्नांची उत्सुकता वाढवणारा ‘जय श्री राम’ हा भव्य मराठी चित्रपट आता मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज होत आहे. वेगळ्या विषयाची लक्षवेधक मांडणी आणि भव्य निर्मितीमूल्ये यांची उत्तम सांगड घालत या चित्रपटाच्या चित्रीकरणाची नुकतीच सुरुवात झाली.
‘सेव्हन ओशन स्टुडिओज’ आणि ‘अमोल कागणे स्टुडिओ प्रॉडक्शन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जय श्री राम’ या चित्रपटाची निर्मिती होत आहे. राम खाटमोडे आणि सागर पाठक या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. सहाय्यक दिग्दर्शक विनोद वणवे आहेत.Jai Shri Ram Pravin Tarde
सुपर स्टार प्रवीण तरडे यांच्यासह मराठी , बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनुभवी व दमदार कलाकारांची भक्कम स्टारकास्ट ही या चित्रपटाचे विशेष आकर्षण आहे. वेगळ्या विषयाची निवड, भव्य निर्मितीमूल्ये आणि नामवंत कलाकारांची मांदियाळी यामुळे ‘जय श्री राम’ या चित्रपटाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे.Jai Shri Ram Pravin Tarde
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीनंतर पाकिस्तानमध्ये घडलेली एक अनपेक्षित आणि धक्कादायक घटना आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. नेमकी ती घटना काय होती? या घटनेचे कोणते अनपेक्षित पैलू पडद्यावर उलगडणार? आणि या कथेला कोणते नाट्यमय वळण मिळणार? अशा अनेक प्रश्नांची उत्सुकता त्यामुळे निर्माण झाली आहे.Jai Shri Ram Pravin Tarde
‘जय श्री राम’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून पाकिस्तानमध्ये घडलेल्या त्या चित्तथरारक घटनेचा थरार रुपेरी पडद्यावर अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.