कोट्यवधी मराठी माणसाला घर देणे हेच हावरेंच्या यशामागील गमक; भूमिपूजन सोहळ्यात भाजपा गटनेते आ. प्रवीण दरेकरांचे गौरवोद्गार


Havare Properties Chembur Project
 
मुंबई, : (Havare Properties Chembur Project)कोट्यावधी मराठी माणसाला घर द्यायचेय ही भावना डॉ. सुरेश हावरे यांच्या मनात आहे व ते त्यांच्या यशाचे गमक असल्याचे गौरवोद्गार भाजपा गटनेते व महाराष्ट्र स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी काढले.
 
चेंबूरच्या टिळकनगर येथील इंटेलीजेंटीया अँपेक्स या हावरे प्रॉपर्टीजतर्फे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळा रविवारी भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी, नगरसेवक सुषम सावंत, हावरे प्रॉपर्टीजचे सर्वेसर्वा डॉ. सुरेश हावरे, अमित हावरे, अमर हावरे, संजय हावरे यांसह सोसायटीचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Havare Properties Chembur Project)
 
भूमिपूजन सोहळ्यात बोलताना आ. दरेकर म्हणाले की, डॉ. सुरेश हावरे यांचे बांधकाम क्षेत्रातील काम मला दुरून पाहता आले. सर्वसामान्य मराठी माणसाला आपले हक्काचे घर मिळावे ही आपलेपणाची भावना घेऊन परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर डॉ. सुरेश हावरे यांनी उभी केली आहेत, याचा सार्थ अभिमान आहे. बांधकाम क्षेत्रात कुठलेही पाठबळ नसताना त्यांनी प्रामाणिकपणे हे उभे केलेय. कोट्यावधी मराठी माणसाला घर द्यायचेय ही भावना त्यांच्या मनात आहे व ते त्यांच्या यशाचे गमक असल्याचेही आ. दरेकरांनी म्हटले.
 
आ. दरेकर पुढे म्हणाले कि, प्रत्येक विकासकाचा मूळ उद्देश आपल्याला घर देणे हा नसतो. तर सेलेबलचा टॉवर उभारून पैसा कमवणे हा असतो. परंतु हावरे यांच्यासारखे व्यावसायिक जे प्रामाणिकपणे काम करतात, त्यांचा उद्देश नफा कमवणे नाही तर मध्यमवर्गीय विशेषतः मराठी माणसाला चांगले घर मिळाले पाहिजे ही भावना घेऊन ते काम करताहेत. सभासदांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेणे व समन्वयातून मार्ग काढण्याचे काम हावरे यांच्या कंपनीतून होताना पाहिल्याचेही दरेकरांनी सांगितले.(Havare Properties Chembur Project)
 
आ. दरेकर पुढे म्हणाले कि, मुंबईत हजारोंच्या संख्येने मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली स्वयं पुनर्विकास योजना राबवूया. गृहनिर्माण संस्थांनी स्वतःची इमारत बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यासाठी मुंबई बँक कर्ज उपलब्ध करून देईल, वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती राज्य सरकार देईल अशी योजना आणली. मुंबई बँकेने धोरण केले. मुख्यमंत्र्यांनी स्वयं पुनर्विकासाला साथ दिली व अनेक निर्णय घेतले. मुंबईतील मराठी माणूस मुंबईबाहेर जाण्यापासून वाचविण्याचा खारीचा वाटा उचलण्याचे काम आम्ही केले. हावरे पण तेच काम करताहेत.कमी नफा झाला तरी चालेल पण मला मध्यमवर्गीयांना घर द्यायचेय ही भावना घेऊन जेव्हा काम करतो तेव्हा निश्चितच अभिमान वाटतो, असे कौतुकोदगारही आ. दरेकरांनी काढले.(Havare Properties Chembur Project)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर