...तेव्हा ‘दिया’चा प्रकाश जातो कुठे?

    03-Nov-2026

Dia Mirza
 
 
हिंदूंच्या प्रत्येक सण-उत्सवांवर पर्यावरणाच्या नावाखाली डोस पाजणारे ‘मिर्झा’, ‘खान’, ‘अख्तर’, ‘शहा’ यांसारख्या आडनावाचे सेलिब्रिटी बकरी ईद, ‘शब-ए-बरात’मधील धुडगुसावर कुठल्या बिळात तोंड खुपसून बसतात? मग अशा वेळी मिर्झांच्या ‘दिया’चा प्रकाश नेमका जातो तरी कुठे?
 
दिया मिर्झा या तद्दन फसलेल्या व बॉलीवूडमधून बेरोजगार किंवा ‘साईड अभिनय’ करणार्‍या अभिनेत्रीकडून नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर ‘पोस्ट’ करण्यात आला. या व्हिडिओमध्ये दिवाळीचे प्रदूषण व फटाक्यांचा आवाज याबाबत तिने आवाहन केले आहे. यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांनी सण कसा साजरा करायचा, हे हिंदूंना शिकवण्याची गरज नसल्याचे सांगत या लढाईत उडी घेतली. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेसाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोतच! अशा या सगळ्या प्रकरणाला दोन-तीन पदर आहेत. दिया मिर्झा किंवा अन्य कुठलेही तथाकथित सेलिब्रिटी जेव्हा अशाप्रकारचे आवाहनाचे व्हिडिओ करतात, तेव्हा त्यांनी केलेल्या व्हिडिओमुळे ती समस्या सुटली, असे झाल्याचे आम्हाला तरी आठवत नाही. परंतु, प्रबोधनात्मक कुणी बोलूच नये, अशी भूमिका घेण्याइतके आम्ही नतद्रष्ट नक्कीच नाही.
 
मूळ मुद्दा येतो तो असा की, ही मंडळी फक्त हिंदूंनाच का शिकवतात? अन्य धर्मियांच्या सणावाराला हे लोक काहीही बोलत नाहीत. यांच्याकडून कोणताही सल्ला दिला जात नाही. बकरी ईदसारखा मुद्दा जेव्हा मुस्लिमांच्या घरापुरता असतो, तेव्हा तो वादाचा नसतो आणि वादाचा होऊही नये. बोकड कापण्याइतके धार्मिक स्वातंत्र्य देशाच्या घटनेने त्यांना दिलेच आहे. मात्र, ते बोकड ‘को-ऑपरेटिव्ह’ सोसायट्यांच्या आवारात आणून बांधणे, त्यांच्या लेंड्या सोसायटीभर पसरणे, त्यांनी सोसायटीच्या आवारातील झाडे खाऊन टाकणे, त्यांचे बळी दिल्यानंतर स्वच्छता करण्यासाठी सोसायटीचे पाणी भरभरून वापरणे, अशा आक्षेपार्ह अनेक गोष्टी घडत असतात. मुंबईत मांडला जाणारा असाच आणखीन एक उच्छाद म्हणजे, ‘शब-ए-बारात.’ तिथे मुस्लीम तरुणांचे जत्थेच्या जत्थे मोठ्या भावाचा कुर्ता आणि लहान भावाचा पायजमा घालून कर्कश हॉर्न वाजवत शहरभर फिरतात, धुडगूस घालतात, ‘ट्राफिक’चे सिग्नल तोडतात, कचरा टाकतात. मात्र, यावर कुणीही काहीही बोलत नाही. मात्र, हा जत्था यावेळेस लालबागच्या गणेशोत्सवात शिरला, त्यावेळेस छत्रपतींचा वारसा सांगणार्‍या लालबाग-परळच्या पोरांनी त्यांच्या कंबरेत तिथेच लाथा घातल्या.
 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यावेळेस ‘मिर्झा’, ‘खान’, ‘शहा’, ‘अख्तर’ अशा आडनावांचे यावर कुणीही आक्षेप घेत नाही. पाण्याच्या अपव्ययापासून ते सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नापर्यंत इथे अनेक प्रश्न तयार होतात. मात्र, त्यावर कुणीही काहीही बोलत नाही. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने या मंडळींना आग्रह केला होता म्हणून त्यांनी हे व्हिडिओ टाकले, असे आम्हाला कळते व त्यात मुंबई उच्च न्यायालयही उतरले आहे. यात काही हरकत नाही. मात्र, दिवाळीच्या नावाने अश्रू ढाळणारी दिया मिर्झा, तीन-तीन लग्ने करून इतरांना तत्त्वज्ञान शिकवणारा आमिर खान, देशात असुरक्षित वाटूनही अद्याप पळून न गेलेला नसरुद्दीन शहा, पोराबाळांसाठी तळ्यात-मळ्यात असणारे जावेद अख्तर अशा सगळ्यांनाच बकरी ईदसाठी आवाहन करायला लावावे व न्यायालयानेही यात हस्तक्षेप करून, हे घडेल असे पाहावे. भेंडीबाजार असो अथवा मालेगाव, इथे आजही कापलेले, सोललेले गोवंश सापडतात. मात्र, यावर ही मंडळी काहीच बोलत नाहीत.
 
अतिशहाणे उरफाटे लोक ‘आता तुमचेच कायद्याचे राज्य आहे, मग बघून घ्या,’ असे म्हणतात. मात्र, हा प्रश्न कायद्याचा नसून, एका अश्मयुगीन समाजाचा अश्मयुगीनच राहण्याचा स्वभाव व दुसर्‍या बाजूला सुधारणावादी असलेला हिंदू समाज, असे हे चित्र आहे. त्या ‘जाहिलां’ना कुणीही सांगत नाही आणि हिंदूंना मात्र उपदेशाचे डोसावर डोस पाजले जातात. पर्यावरण, धरण प्रकल्पांतील विस्थापित, वातावरणीय बदलातून निर्माण होणारी आंदोलने ही सगळी ‘अल्टरनेट पॉलिटिक्स’ची माध्यमे आहेत. हिंदू समाजातील भाबड्यांना या गोष्टी कळत नाहीत. (आता विद्यार्थी आंदोलनेही त्यात आली आहेत.) लोक जत्थ्याने जाऊन उभे राहतात आणि अण्णांना बाजूला सारून केजरीवाल मोठे होतात. वांगचूकला बाजूला सारून दीपके मोठा होतो.
 
हिंदू समाज बदलतो आणि समाजात व देशातही बदल घडवून आणतो. हा सहिष्णू समाजाचा स्थायीभावच आहे. त्याचे कारण, हिंदू समाज बदलांना सामोरा जातो, बदल आत्मसात करतो व काळानुसार बदलतो. त्यात समाजसुधारकांचा मोठा वाटा असतो. राजा राममोहन रॉय यांनी सतिप्रथा बंद केली. महर्षी कर्वे यांनी स्त्रीशिक्षणाचा पाया घातला. फुले दाम्पत्याने शिक्षणाचे मोठे कार्य केले. ही आणि अशी कितीतरी नावे आजही ‘सुधारणावादी’ म्हणून आदराने घेतली जातात. अशाप्रकारचे मूलभूत परिवर्तन घडवून आणणार्‍या सुधारकांच्या यादीत कुणीही नट-नट्या नाहीत. मात्र, सोशल मीडियाच्या जमान्यात या लफडेबाजांनाच ‘तत्त्वज्ञ’ किंवा ‘समाजसुधारक’ मानून त्यांना अमाप प्रसिद्धी दिली जाते. कधीकधी ही मंडळी कुठल्या तरी पाश्चिमात्य उत्पादनांचे उत्पादन पुढे रेटणारे एजंटही असतात, ज्यांना हा विषय माहीत करून घेण्यात रस असेल, त्यांनी ‘ग्लोबल मार्केट फोर्सेस’ व ‘कल्चरल मार्क्सिझम’ या दोन्ही संकल्पना जरूर अभ्यासाव्यात.
 
हिंदूंचे सण सुधारले जातीलच. परंतु, ते या एजंटांचे ‘गिनी पिग’ नाहीत. कोकणात शिमग्याला शिकार केली जात असे. हे प्रमाण आता लक्षणीय घटले आहे. त्याचे कारण, तिथल्या मंडळींनी वन्यजीव संरक्षण कायद्याचा आदर राखला. हिंदू इतका भाबडा आहे की, एका माणसाचा बळी घेणारा ‘ओंकार’ हत्तीसुद्धा तिथे अंगणात आला की, ‘देव आला’ म्हणून लोक पूजायला लागतात. गणेशोत्सवाकडे बघण्याचा व ते साजरे करण्याचा लोकांचा दृष्टिकोनदेखील बदलत आहे. खुद्द दै. ‘मुंबई तरुण भारत’ व ‘महाएमटीबी’चे दोन प्रयोग यात ठळकपणे सांगण्यासारखे आहेत. यंदा पालघर पोलिसांबरोबर ‘डीजेमुक्त गणेश विसर्जन मिरवणुकी’ची स्पर्धा घेेण्यात आली. त्यात सुमारे दोन हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवला. पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याच्या आमच्या अशाच स्पर्धेत गेल्या तीन-चार वर्षांत सात हजार कुटुंबांनी आपला सहभाग नोंदवला आहे. या दोन्ही स्पर्धांतले सहभागाचे आकडे खूप मोठे आहेत. यासाठी कुठल्याही सेलिब्रिटींनी आपली तोंडे वाजवलेली नाहीत. परिवर्तनाच्या प्रक्रिया अशाप्रकारे संयतपणे सुरू असतात. आता ‘मिर्झा’, ‘खान’, ‘शहा’, ‘अख्तर’ वगैरे मंडळींनी दुधीभोपळ्याचे पाच बोकड तयार करून त्याला पडवळाचे पाय लावून व त्याला जाहीर बळी देऊन बकरी ईद साजरी करून घ्यावी व आपले ‘सेलिब्रिटीपण’ खर्ची घालावे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ पहिल्या पानावर याला नक्कीच प्रसिद्धी देईल. मात्र, असे काही घडणार नाही, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे आपल्यातल्या भाबड्यांनी असल्या फडतूस लोकांच्या कदापि नादी लागू नये.







संबंधित मजकूर