‘बँक ऑफ बडोदा’ला दुसऱ्या तिमाहीत ७,८१० कोटी निव्वळ नफा

    03-Nov-2026


Bank of Baroda Q2 Results

 
मुंबई : (Bank of Baroda Q2 Results)‘बॅंक ऑफ बडोदा’ने २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत (क्यू२-एफवाय२७) आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही निव्वळ नफा नोंदवला आहे. हा नफा ६,५३२ कोटी रुपये असून, गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या (क्यू२-एफवाय२६) तुलनेत त्यात ३५.८ टक्के वाढ झाली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एच१-एफवाय२७) बँकेचा निव्वळ नफा ७,८१० कोटी रुपये झाला. या तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याजाचे उत्पन्न (एनआयआय) गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ९ टक्क्यांनी वाढून १३,०२६ कोटी रुपये झाले आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत हे उत्पन्न ९.२ टक्के वाढीसह २५,५५१ कोटी रुपये झाले आहे. बँकेचे व्याजेतर उत्पन्न ६,८८१ कोटी रुपये झाले.
 
गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत त्यात ९५.८ टक्के वाढ झाली. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत हे उत्पन्न १०,३५१ कोटी रुपये झाले असून, त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २६.४ टक्के वाढ झाली आहे. बँकेच्या परिचालन उत्पन्नात गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत २८.७ टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत हे उत्पन्न १९,९०७ कोटी रुपये झाले आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ते १३.७ टक्के वाढीसह ३५,९०२ कोटी रुपये झाले आहे. सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत बँकेचा परिचालन खर्च ८,४७७ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत त्यात ७.४ टक्के वाढ झाली आहे. सहामाहीत हा खर्च ३.७ टक्क्यांनी वाढून १६,३४५ कोटी रुपये झाला आहे.(Bank of Baroda Q2 Results)
 
बँकेचा या तिमाहीतील परिचालन नफा ५०.९ टक्क्यांनी वाढून ११,४३० कोटी रुपये झाला आहे. हा बँकेचा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही परिचालन नफा आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बँकेचा परिचालन नफा २३.७ टक्क्यांनी वाढून १९,५५७ कोटी रुपये झाला आहे. बँकेच्या मालमत्तेवरील परतावा (आरओए) गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत १९ बेसिस पॉइंट्सने वाढून १.२६ टक्के झाला आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आरओए ०.७५ टक्के राहिला. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेच्या भागभांडवलावरील परतावा (आरओई) ३६३ बेसिस पॉइंट्सने वाढून १९.२८ टक्के झाला आहे. पहिल्या सहामाहीत हा आरओई ११.६३ टक्के राहिला. बँकेच्या कर्जवसुलीची स्थिती चांगली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण थकीत कर्जांचे प्रमाण (जीएनपीए) गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ३८ बेसिस पॉइंट्सने कमी होऊन १.७८ टक्के झाले आहे.
 
बँकेच्या निव्वळ थकीत कर्जांचे प्रमाणदेखील (एनएनपीए) २० बेसिस पॉइंट्सने कमी होऊन ०.३७ टक्के झाले आहे. बँकेची ताळेबंदातील स्थिती चांगली असून, प्रोव्हिजन कव्हरेज रेशो (पीसीआर) समाधानकारक आहे. टीडब्ल्यूओसह पीसीआरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १४४ बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे. ते ९४.६५ टक्क्यांवर पोहोचले आहे. टीडब्ल्यूओ वगळता पीसीआरमध्ये ५३५ बेसिस पॉइंट्सची वाढ झाली असून, ते ७९.४८ टक्के झाले आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत बँकेचे स्लिपेज प्रमाण २२ बेसिस पॉइंट्सने कमी झाले आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत हे प्रमाण ०.६९ टक्के होते. पहिल्या सहामाहीत हे प्रमाण ०.६७ टक्के राहिले. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच सहामाहीत ते ०.९० टक्के होते. बँकेचा एकूण जागतिक व्यवसाय १७.२ टक्क्यांनी वाढून ३२,५७,८८३ कोटी रुपये झाला आहे. ३० सप्टेंबर २०२६ रोजी जागतिक ठेवींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १६.४ टक्के वाढ झाली आहे. देशांतर्गत ठेवींमध्ये १६.६ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. बँकेच्या देशांतर्गत कासा ठेवींमध्ये १०.४ टक्के वाढ झाली आहे. या ठेवी ५,३९,५१५ कोटी रुपये झाल्या आहेत. ३० सप्टेंबर २०२६ रोजी बँकेच्या जागतिक कर्जवाटपात गेल्या वर्षीच्या तुलनेत १८.३ टक्के वाढ झाली आहे. देशांतर्गत कर्जवाटप १३.५ टक्क्यांनी वाढले आहे. रिटेल, कृषी आणि एमएसएमई कर्जांचा समावेश असलेल्या आरएएम पोर्टफोलिओमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ टक्के वाढ झाली आहे. ३० सप्टेंबर २०२६ रोजी देशांतर्गत एकूण कर्जवाटपात या कर्जांचा वाटा ६४.२ टक्के होता.(Bank of Baroda Q2 Results)
 
२०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा ६,५३२ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत त्यात ३५.८ टक्के वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत निव्वळ नफा ७,८१० कोटी रुपये झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याजाचे उत्पन्न १३,०२६ कोटी रुपये झाले. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत त्यात ९ टक्के वाढ झाली. पहिल्या सहामाहीत हे उत्पन्न ९.२ टक्के वाढीसह २५,५५१ कोटी रुपये झाले आहे. सऱ्या तिमाहीत बँकेचे व्याजेतर उत्पन्न ६,८८१ कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत त्यात ९५.८ टक्के वाढ झाली आहे. पहिल्या सहामाहीत हे उत्पन्न २६.४ टक्के वाढीसह १०,३५१ कोटी रुपये झाले आहे. दुसऱ्या तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याजाचे जागतिक मार्जिन (एनआयएम) २.७४ टक्के राहिले. पहिल्या सहामाहीत निव्वळ व्याज मार्जिन (एनआयएम) २.७६ टक्के होते.
 




संबंधित मजकूर