'प्लीज यार, मराठी सिनेमा करू नका!’ निर्माते-दिग्दर्शक सचिन धोत्रे यांची खंत; ‘मिरांडा वॉर्निंग’ला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने व्यक्त केली नाराजी!

    29-Nov-2026

sachin
 
 
 
 
 मुंबई ( विशेष प्रतिनिधी ) -sachin dhotre miranda warning Jahnavi Killekar मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन विषयांवर चित्रपट बनवण्याचे प्रयत्न होत असताना, अशा चित्रपटांना प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत निर्माते-दिग्दर्शक सचिन धोत्रे यांनी व्यक्त केली आहे. त्यांचा ‘मिरांडा वॉर्निंग’ हा चित्रपट नुकताच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. मात्र, उत्तम स्टारकास्ट, वेगळा विषय आणि चांगली कथा असूनही चित्रपटाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी नवोदित निर्माते-दिग्दर्शकांना उद्देशून, ‘प्लीज यार, मराठी सिनेमा करू नका!’ असे भावनिक आवाहन केले आहे.
‘मिरांडा वॉर्निंग’ हा चित्रपट अत्यंत सुंदर पद्धतीने बनवला आहे. उत्तम कलाकारांची फळी, चांगली कथा आणि मराठी चित्रपटसृष्टीत काहीतरी वेगळे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, प्रेक्षकांकडून चित्रपटाला चांगले रिव्ह्यूजही मिळत आहेत. मात्र, त्यानंतरही चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची अपेक्षित गर्दी होत नसल्याची खंत धोत्रे यांनी व्यक्त केली.sachin dhotre miranda warning Jahnavi Killekar
मराठी चित्रपट बनवणे आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हा अत्यंत कठीण प्रवास असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मराठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक येतील की नाही, याची कोणतीही खात्री देता येत नाही. वर्षभरात मोजकेच चार-पाच चित्रपट यशस्वी होतात. त्यातही प्रस्थापित कलाकारांच्या चित्रपटांना काही प्रमाणात प्रतिसाद मिळतो; मात्र नव्या निर्माते-दिग्दर्शकांसाठी हा प्रवास अधिक आव्हानात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले.sachin dhotre miranda warning Jahnavi Killekar
पंढरपूरमधून येऊन आपण चित्रपट निर्मिती केली. चांगली स्टारकास्ट निवडली, उत्तम कथा हाती घेतली आणि चित्रपटासाठी मनापासून मेहनत घेतली. मात्र, एवढे प्रयत्न करूनही प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात येत नसतील, तर त्याचे दुःख वाटणे स्वाभाविक असल्याचे धोत्रे यांनी सांगितले. चित्रपट बनवताना आर्थिक गुंतवणुकीपासून ते मानसिक ताणापर्यंत अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. या संपूर्ण प्रक्रियेतून जाणाऱ्या निर्मात्यालाच त्यामागील संघर्षाची खरी जाणीव असते, असेही ते म्हणाले.sachin dhotre miranda warning Jahnavi Killekar
मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याची परिस्थिती बदलण्याची गरज असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून अधोरेखित होते. आपले हे वक्तव्य काहींना आवडणार नाही, तर काही जण नाराजही होतील; मात्र मनातली खंत व्यक्त करावीशी वाटल्याने आपण हे बोलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.sachin dhotre miranda warning Jahnavi Killekar
 




संबंधित मजकूर