श्रीराम मंदिरातील देणगी व्यवस्थापन होणार अधिक पारदर्शक आणि आधुनिक; शिर्डीच्या साई मंदिरातील व्यवस्थांचा अभ्यास

    29-Nov-2026
 
Ram Temple donation management
 
मुंबई (Ram Temple donation management) : श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने मंदिरातील देणगी व्यवस्थापन अधिक पारदर्शक, सुलभ आणि आधुनिक करण्याच्या दिशेने पुढाकार घेतला आहे. याच उद्देशाने न्यासाचे एक पथक शिर्डी येथील साई मंदिराला भेट देऊन तेथील व्यवस्थांचा सविस्तर अभ्यास करून परतले आहे.
 
न्यासाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा (निवृत्त) आणि सचिव जगदीश आफळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शिर्डी येथे देणगी व्यवस्थापन आणि प्रशासकीय प्रक्रियांचा अभ्यास केला. यावेळी मंदिरातील धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांसह सुरक्षा, स्वच्छता तसेच प्रसाद वितरण व्यवस्थेचीही पाहणी करण्यात आली.(Ram Temple donation management)
 
पथकाने देणगी रक्कम मोजणी केंद्रातील कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती, देणग्यांचे वर्गीकरण, नोंदणी आणि लेखांकन प्रक्रियेची बारकाईने माहिती घेतली. तसेच सोने-चांदीच्या वस्तूंच्या सुरक्षित साठवणुकीच्या व्यवस्थेचाही अभ्यास केला.
 
सध्या हे पथक अभ्यास अहवाल तयार करत आहे. या अहवालात श्री रामजन्मभूमी मंदिरात राबविता येऊ शकणाऱ्या उपाययोजनांचा समावेश असेल. अयोध्येतील परिस्थिती आणि मंदिराच्या गरजा लक्षात घेऊनच या व्यवस्थांची निवड केली जाणार आहे.(Ram Temple donation management)
 
देणगीदारांसाठी बसण्याची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच नाण्यांची मोजणी अधिक सुव्यवस्थित करण्याबाबतही विचार केला जाणार आहे. नाण्यांच्या मोजणीसाठी यंत्रांचा वापर करण्याच्या शक्यतेचाही अभ्यास केला जाईल. देणगी व्यवस्थापनाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि आधुनिक करण्यासोबतच तिच्यातील पारदर्शकता अधिक बळकट करणे, हा या सर्व प्रयत्नांचा मुख्य उद्देश आहे.(Ram Temple donation management)
 
 




संबंधित मजकूर