गुरूंच्या संस्कारांतूनच संगीत साधनेला खरा अर्थ प्राप्त होतो – पं. सुरेश तळवलकर

लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतींना अभिवादन करीत ‘मृद‌्‌गंध पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात संपन्न!

    29-Nov-2026

mrudgandh
 
 
 
 
 
 
मुंबई (प्रतिनिधी )-mrudugandha purskar nandesh umap “पुरस्काराने मन आनंदित होतं, नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. अशा वेळी गुरूंची आठवण येणं स्वाभाविक आहे. गुरुकृपेशिवाय साधनेला अर्थ नाही आणि संगीत क्षेत्रात गुरूंचं स्थान अनन्यसाधारण आहे. संगीताचं ज्ञान बाहेरून आत येत नाही, ते अनुभूतीतून आत्मसात होतं. वेगवेगळ्या अनुभवांतून ज्ञान प्राप्त होतं आणि हे ज्ञान नेहमी आतून बाहेर प्रवाहित होतं. अनुभूती साधनेशिवाय, साधना संस्कारांशिवाय आणि संस्कार गुरूशिवाय शक्य नाहीत, असे सांगत भारतीय शास्त्रीय संगीताच्या अभिजात परंपरेतील गुरूचे महत्त्व पद्मश्री तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी अधोरेखित केले. १६ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृद‌्‌गंध पुरस्कार २०२६’च्या दिमाखदार समारंभात ते बोलत होते. यंदाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ पद्मश्री तालयोगी श्री पं.सुरेश तळवलकर यांना प्रदान करण्यात आला.
यंदाचा १६वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनचा प्रतिष्ठित ‘मृद‌्‌गंध पुरस्कार २०२६’ सोहळा ठाण्याच्या गडकरी रंगायतन मध्ये उत्साहात संपन्न झाला. खासदार नरेश म्हस्के आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांची प्रतिकृती असलेले आकर्षक मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. लोककलेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे संगीत नाटक अकादमी व राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते.mrudugandha purskar nandesh umap
‘मृद‌्‌गंध पुरस्कार २०२६’ मध्ये लोककला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा, छायाचित्रण आणि पत्रकारिता क्षेत्रासाठी पद्मश्री सुधारक ओलवे, अभिनय व दिग्दर्शन क्षेत्रासाठी संदेश कुलकर्णी, अभिनय क्षेत्रासाठी अभिनेत्री अमृता सुभाष, तर नवोन्मेष प्रतिभा या विभागात गायक चैतन्य देवढे (माऊली) यांना सन्मानित करण्यात आले.mrudugandha purskar nandesh umap
गायक चैतन्य देवढे (माऊली) यांनी पुरस्कार स्वीकारताना विठ्ठलाचा आशीर्वाद लाभल्याची भावना व्यक्त केली. या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, पुरस्कारामुळे आनंद आणि नवी प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार लाखमोलाचा असल्याची भावना पुरस्कार विजेत्यांनी व्यक्त केली. सोहळ्यात प्रसिद्ध गायिका प्रियांका बर्वे, अरुण पेदे वेसावकर आणि त्यांच्या मंडळींनी आपल्या बहारदार कलाविष्कारातून लोकशाहीर विठ्ठल उमप यांना सांगीतिक मानवंदना अर्पण केली.mrudugandha purskar nandesh umap
“बाबांचे कार्य खूप मोठे आहे. त्यांचा वारसा पुढे नेताना आमच्यावर मोठी जबाबदारी आहे. आजवर ६५ मान्यवरांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली. या मान्यवरांचा सन्मान करताना आम्हालाही सन्मानित झाल्यासारखं वाटतं, अशी भावना व्यक्त करत प्रसिद्ध गायक आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश वत्सला विठ्ठल उमप यांनी उपस्थित मान्यवर आणि रसिकांचे आभार मानले. अभिनेत्री डॉ. समीरा गुजर यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.mrudugandha purskar nandesh umap




संबंधित मजकूर