पणजी (कपिल देशपांडे ) - iffi 2026 cinema scroll मोबाईल हातात घेतल्यानंतर काही मिनिटांसाठी सुरू झालेला स्क्रोलिंगचा प्रवास कधी तासन्तास चालतो, हे अनेकदा आपल्यालाही कळत नाही. सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स, सोशल मीडियाचे आकर्षण आणि नव्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता यामुळे स्मार्टफोन आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, हाच स्मार्टफोन आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवू लागला तर? या प्रश्नाचा थरारक वेध तमिळ चित्रपट ‘स्क्रोल’ घेतो. ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाने आपल्या वेगळ्या कथनशैलीमुळे लक्ष वेधून घेतले.
‘इंडियन पॅनोरमा’ विभागात निवड झालेल्या या १२८ मिनिटांच्या मानसशास्त्रीय थरारपटाला प्रतिष्ठित ‘आयसीएफटी-युनेस्को गांधी पदका’साठी नामांकन मिळाले आहे. या विभागात नामांकन मिळवणारा तो एकमेव तमिळ चित्रपट आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण चित्रपटाचे कथानक मोबाईल फोनच्या स्क्रीनवरून उलगडते. चित्रपटाच्या या अनोख्या प्रयोगाविषयी दिग्दर्शक-निर्माते कन्नन एस आणि प्रमुख कलाकार अरविंद सुंदर व काव्या अनिल यांनी इफ्फीमध्ये मुंबई तरुण भारतसोबत संवाद साधला..iffi 2026 cinema scroll
चित्रपटाची कथा स्मार्टफोनच्या व्यसनात अडकलेल्या एका तरुणाभोवती फिरते. या व्यसनातून बाहेर पडून स्वतःच्या आयुष्यावर पुन्हा नियंत्रण मिळवण्यासाठी तो ‘डोपा रश’ नावाचे ॲप डाउनलोड करतो. सुरुवातीला या ॲपमध्ये काही टास्क पूर्ण केल्यावर गुण आणि बक्षिसे मिळतात. मोबाईलपासून दूर राहण्यासाठी तयार केलेला हा खेळ हळूहळू अधिक कठीण आणि विचित्र आव्हानांकडे वळतो. पुढे या आव्हानांचे स्वरूप वैयक्तिक आणि मानसिकदृष्ट्या त्रासदायक बनते. व्यसनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करणारा तरुणच एका भयावह डिजिटल जाळ्यात अडकतो.iffi 2026 cinema scroll
चित्रपटाच्या संकल्पनेविषयी बोलताना दिग्दर्शक कन्नन एस यांनी सांगितले की, आजच्या तरुणांमध्ये वाढत असलेल्या डिजिटल अवलंबित्वाबाबत विचार निर्माण करणे हा चित्रपटाचा मुख्य उद्देश आहे. ‘ब्लू व्हेल चॅलेंज’सारख्या वास्तविक डिजिटल घटनांपासून प्रेरणा घेऊन चित्रपटाची मांडणी करण्यात आली आहे.iffi 2026 cinema scroll
आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकासाठी मिळालेल्या नामांकनाविषयी बोलताना त्यांनी सत्य, अहिंसा आणि आत्मसंयम या गांधीवादी मूल्यांचे आजच्या तंत्रज्ञानप्रधान जगातही असलेले महत्त्व अधोरेखित केले. प्रेक्षकांना थेट उपदेश करण्याऐवजी उत्कंठावर्धक थरारपटाच्या माध्यमातून सामाजिक संदेश द्यायचा होता, असे त्यांनी स्पष्ट केले.iffi 2026 cinema scroll
मोबाईल स्क्रीनवरच चित्रपट साकारण्याचे आव्हान
‘स्क्रोल’चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची ‘स्क्रीन-लाइफ’ ही कथनशैली. संपूर्ण चित्रपट मोबाईल फोनच्या इंटरफेसमधून उलगडत असल्यामुळे पारंपरिक चित्रपटांप्रमाणे दृश्यांची मांडणी करण्याचे स्वातंत्र्य दिग्दर्शकांना नव्हते. मर्यादित स्क्रीनमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता टिकवून ठेवणे आणि कथानकातील नाट्यमय ताण कायम राखणे हे मोठे आव्हान होते.iffi 2026 cinema scroll
कन्नन यांनी सांगितले की, चित्रपटातील बहुतांश कलाकारांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून स्वतंत्रपणे आपापल्या दृश्यांचे चित्रीकरण केले. विशेष म्हणजे, चित्रपट महोत्सवात भेटण्यापूर्वी अनेक कलाकारांची प्रत्यक्ष भेटही झाली नव्हती.iffi 2026 cinema scroll