'पारो : द अनटोल्ड स्टोरी ऑफ ब्राइड स्लेव्हरी’मधून वधू तस्करीच्या भयावह वास्तवाचे दर्शन!

    29-Nov-2026

trupti
 
 
 
 
 पणजी ( विशेष प्रतिनिधी ) - iffi 2026 cinema paaro trupti bhoir लग्नासारख्या पवित्र नात्याच्या आडून महिलांची होणारी विक्री, तस्करी आणि शोषण यांचे वास्तव अनेकदा समाजाच्या नजरेआड राहते. याच गंभीर विषयाला हात घालत अभिनेत्री, निर्माती आणि पटकथालेखिका तृप्ती भोईर यांनी ‘पारो : द अनटोल्ड स्टोरी ऑफ ब्राइड स्लेव्हरी’ या चित्रपटातून वधू तस्करीच्या भयावह वास्तवावर प्रकाश टाकला आहे. ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाच्या माध्यमातून महिलांचे शोषण, लैंगिक विषमता आणि स्त्रियांच्या मूलभूत हक्कांचा महत्त्वपूर्ण प्रश्न मांडण्यात आला आहे.
या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तृप्ती भोईर यांनी तब्बल साडेचार वर्षे संशोधन केले. भारतातील वधू तस्करीसंदर्भातील माहितीपट आणि प्रसारमाध्यमांमधील वृत्तांकनातून त्यांना या विषयाची गंभीरता जाणवली. त्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने तृप्ती भोईर आणि त्यांच्या आईने पत्रकारांच्या वेशात विविध गावांना भेटी दिल्या. या संशोधनादरम्यान त्यांनी वधू गुलामगिरीला बळी पडलेल्या सुमारे ६२ ते ६३ महिलांशी संवाद साधला. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिशा, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि दिल्ली या राज्यांतील महिलांच्या व्यथा त्यांनी जाणून घेतल्या.iffi 2026 cinema paaro trupti bhoir
हरियाणातील मेवात परिसरात विशेषतः आढळणारी ही प्रथा केवळ एका राज्यापुरती मर्यादित नसून, गरिबी आणि स्त्री-पुरुष असमानतेतून निर्माण झालेली व्यापक सामाजिक समस्या असल्याचे तृप्ती भोईर यांनी स्पष्ट केले.iffi 2026 cinema paaro trupti bhoir
संशोधनादरम्यान समोर आलेल्या घटनांपैकी एका अंदाजे ११ ते १३ वर्षांच्या मुलीची कहाणी विशेष अस्वस्थ करणारी होती. या मुलीची अत्यंत किरकोळ रकमेत विक्री झाल्याची माहिती समोर आली. याच मुलीच्या कहाणीपासून चित्रपटातील मुख्य पात्राची प्रेरणा मिळाली. या व्यक्तिरेखेत तृप्ती भोईर स्वतः दिसणार आहेत.iffi 2026 cinema paaro trupti bhoir
या चित्रपटात तृप्ती भोईर यांनी अभिनेत्री, निर्माती आणि पटकथालेखिका अशा तिन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. विशेष म्हणजे, हा त्यांचा ऑस्करच्या यादीत स्थान मिळवणारा दुसरा चित्रपट असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.iffi 2026 cinema paaro trupti bhoir
चित्रपटाच्या पलीकडे जाऊन सामाजिक लढा
‘पारो’चे महत्त्व केवळ चित्रपटाच्या कथानकापुरते मर्यादित नाही. शेल्टर फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने वधू गुलामगिरीच्या बळी ठरलेल्या सुमारे दोन हजार महिलांची माहिती संकलित केली आहे. ही माहिती सुमारे वर्षभरापूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडे सादर करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी तथ्यशोधन समिती स्थापन केली असल्याचे तृप्ती भोईर यांनी सांगितले.iffi 2026 cinema paaro trupti bhoir
मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाबाबत गेल्या १५ ते २० वर्षांत जागरूकता वाढली असली, तरी विवाहाच्या नावाखाली महिलांची खरेदी-विक्री आणि वधू गुलामगिरी या विषयांकडे तुलनेने कमी लक्ष दिले जात असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.iffi 2026 cinema paaro trupti bhoir
 




संबंधित मजकूर