ऑस्कर पुरस्कारांचा प्रवास उलगडला! नताली वेड यांनी इफ्फीमध्ये चित्रपट निर्मात्यांना दिले मार्गदर्शन!

    29-Nov-2026
 
wed
 
 
 
 
 
 
पणजी (विशेष प्रतिनिधी ) - iffi 2026 cinema oscar ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपट निर्माते, विद्यार्थी आणि सिनेरसिकांसाठी ‘Decoding Academy Awards’ या विशेष मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आले. २६ नोव्हेंबर रोजी गोव्यातील कला अकादमी येथे पार पडलेल्या या सत्रात ऑस्कर पुरस्कारांसाठी चित्रपट पाठवण्याची प्रक्रिया, पात्रतेचे निकष, पुरस्कारांसाठी प्रचारमोहीम आणि नवोदित चित्रपट निर्मात्यांसाठी उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय संधींची माहिती देण्यात आली.
या मास्टरक्लासचे मार्गदर्शन अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या मेंबर रिलेशन्स अँड अवॉर्ड्स अॅडमिनिस्ट्रेशन विभागाच्या उपाध्यक्ष नताली वेड यांनी केले. इफ्फीचे महोत्सव संचालक अशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.iffi 2026 cinema oscar
ऑस्करसाठी चित्रपट सादर करण्याची संपूर्ण प्रक्रिया अनेक चित्रपट निर्मात्यांना माहिती नसते. त्यामुळे चित्रपटाच्या प्राथमिक नोंदणीपासून ते पुरस्कारांच्या अंतिम टप्प्यापर्यंतचे नियम, औपचारिक प्रक्रिया आणि आवश्यक अटी समजावून सांगणे हा या मास्टरक्लासचा मुख्य उद्देश असल्याचे नताली वेड यांनी स्पष्ट केले.iffi 2026 cinema oscar
त्यांनी जनरल एन्ट्री आणि बेस्ट पिक्चर या विभागांसाठी आवश्यक पात्रता आणि चित्रपटांच्या निवडीचे निकष समजावून सांगितले. ऑस्करच्या सर्वसाधारण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतील सहा निश्चित महानगरांपैकी किमान एका ठिकाणी सलग सात दिवस चित्रपटाचे व्यावसायिक प्रदर्शन होणे आवश्यक असल्याची माहितीही त्यांनी दिली.iffi 2026 cinema oscar
अभिनय, छायाचित्रण, दिग्दर्शन, चित्रपट संकलन, संगीत, ध्वनी, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि पटकथा लेखन अशा विविध विभागांतील पुरस्कारांसाठी असलेल्या पात्रतेविषयीही त्यांनी सविस्तर माहिती दिली.iffi 2026 cinema oscar
इंटरनॅशनल फीचर फिल्म, डॉक्युमेंटरी फीचर आणि शॉर्ट फिल्म या विभागांसाठी चित्रपट सादर करण्याचे निकषही या सत्रात स्पष्ट करण्यात आले. मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधील सहभागाच्या माध्यमातून काही विभागांसाठी पात्रता मिळवण्याचे मार्गही त्यांनी समजावून सांगितले.iffi 2026 cinema oscar
याशिवाय, अकॅडमी स्क्रीनिंग रूम या डिजिटल व्यासपीठाची माहिती देण्यात आली. या माध्यमातून अकॅडमीच्या सदस्यांना चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात. चित्रपट सादरीकरणासाठी आवश्यक तांत्रिक बाबी, नियम आणि शुल्क यांवरही चर्चा झाली.iffi 2026 cinema oscar
भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर मिळणारी ओळख अधोरेखित करताना नताली वेड यांनी ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या भारतीय माहितीपटाचा उल्लेख केला. चित्रपटाला भौगोलिक सीमा नसतात आणि जगभरातील चित्रपट निर्माते व सिनेकर्मी अकॅडमीच्या जागतिक व्यासपीठाचा भाग आहेत, असे त्यांनी नमूद केले.iffi 2026 cinema oscar




संबंधित मजकूर