पणजी ( विशेष प्रतिनिधी ) - iffi 2026 cinema ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सिनेमा ऑफ द वर्ल्ड’ या विभागात प्रदर्शित होणाऱ्या ‘अ फ्यू डेज इन द सन’मध्ये या द्विभाषिक चित्रपटाने लक्ष वेधून घेतले आहे. मेक्सिकोमधील रिव्हिएरा माया येथील पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट सामाजिक विषमता, आर्थिक परिस्थिती, सत्तेचा गैरवापर आणि जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे वास्तव थरारक पद्धतीने मांडतो. यावेळी पत्रकार परिषदेत चित्रपटाचे दिग्दर्शक मॉरो म्युलर, लेखक जोसे डेव्हिड फिग्युरोआ गार्सिया आणि निर्मात्या लेस्ली होलेरन यांनी चित्रपटाच्या निर्मितीमागील विचार आणि कथानकाविषयी संवाद साधला.
या चित्रपटाचा केंद्रबिंदू म्हणजे एका व्यक्तीसाठी जे ठिकाण पर्यटन आणि सुट्टीचा आनंद घेण्याचे माध्यम असते, तेच दुसऱ्या व्यक्तीसाठी घर आणि रोजच्या जगण्याचा आधार असते. या दोन भिन्न जगांची टक्कर झाल्यावर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे.iffi 2026 cinema
दिग्दर्शक मॉरो म्युलर यांनी आपल्या वैयक्तिक अनुभवांचा या कथानिर्मितीवर प्रभाव असल्याचे सांगितले. स्वित्झर्लंडमध्ये बालपण गेलेल्या म्युलर यांनी मेक्सिको आणि अमेरिकेतही वास्तव्य केले आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करणे आणि तेथील संस्कृती अनुभवणे यामुळे माणसांमध्ये सहानुभूती निर्माण होते, असे त्यांचे मत आहे. जगण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि कोणतीही जीवनशैली दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते, हे समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.iffi 2026 cinema
लेखक जोसे डेव्हिड फिग्युरोआ गार्सिया यांनी चित्रपटातील सांस्कृतिक आणि सामाजिक वर्गांमधील संघर्षावर प्रकाश टाकला. समान स्वरूपाचे निर्णय घेतल्यानंतरही श्रीमंत आणि गरीब व्यक्तींना त्याचे परिणाम वेगवेगळ्या प्रकारे भोगावे लागतात. श्रीमंत युरोपियन जोडप्याच्या कृतींचा त्यांच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही; मात्र सर्वसामान्य कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य त्यामुळे बदलून जाते, असे त्यांनी नमूद केले.iffi 2026 cinema
गार्सिया यांनी समाजातील प्रत्येक स्तरावर पसरलेल्या भ्रष्टाचाराचाही उल्लेख केला. सामान्य स्तरावर लाचखोरीच्या स्वरूपात दिसणारा भ्रष्टाचार आणि सत्तेच्या जोरावर स्थानिक समुदायाला जमिनीवरून हटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रीमंत वर्गाचा भ्रष्टाचार या दोन्हींचे गांभीर्य चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
iffi 2026 cinema iffi 2026 cinema