पणजी ( कपिल देशपांडे ) : iffi 2026 cinema goa चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून भावना, अनुभव आणि कथा यांना जोडणारी वैश्विक भाषा आहे. मात्र, सिनेमाचा हा अनुभव समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. यंदाच्या महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागांतर्गत २५ निवडक चित्रपटांसाठी ऑडिओ डिस्क्रिप्शन आणि क्लोज्ड कॅप्शन्स या विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
दृष्टिदोष आणि श्रवणदोष असलेल्या प्रेक्षकांनाही चित्रपटांचा आनंद घेता यावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. यासाठी 'सिनेडब्स' या संस्थेच्या सहकार्याने ही सुविधा राबवण्यात येत असून, हे चित्रपट आयनॉक्स-२ येथे प्रदर्शित केले जात आहेत.iffi 2026 cinema goa
काय आहेत ऑडिओ डिस्क्रिप्शन आणि क्लोज्ड कॅप्शन्स?
ऑडिओ डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून चित्रपटातील संवादांमधून स्पष्ट न होणाऱ्या दृश्यांचे वर्णन आवाजाच्या स्वरूपात केले जाते. यामध्ये पात्रांच्या हालचाली, चेहऱ्यावरील हावभाव, प्रसंगांची पार्श्वभूमी आणि दृश्यांमधील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती दिली जाते. त्यामुळे दृष्टिदोष असलेल्या प्रेक्षकांना चित्रपटातील दृश्ये समजून घेणे शक्य होते.iffi 2026 cinema goa
दुसरीकडे, क्लोज्ड कॅप्शन्सच्या माध्यमातून चित्रपटातील संवाद, पार्श्वसंगीत, ध्वनीप्रभाव आणि इतर महत्त्वाचे आवाज लिखित स्वरूपात उपलब्ध करून दिले जातात. यामुळे श्रवणदोष असलेल्या प्रेक्षकांना चित्रपटातील कथानक आणि प्रसंग समजून घेण्यास मदत होते.iffi 2026 cinema goa
विशेष म्हणजे, या दोन्ही सुविधा प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या स्मार्टफोनवर 'सिनेडब्स' मोबाईल ॲपच्या माध्यमातून हेडफोन वापरून अनुभवता येणार आहेत. त्यामुळे चित्रपटाचे नियमित प्रदर्शन सुरू असतानाच संबंधित प्रेक्षकांना त्यांच्या गरजेनुसार या सुविधा वापरता येतील. इतर प्रेक्षकांच्या चित्रपट पाहण्याच्या अनुभवातही कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.iffi 2026 cinema goa
या उपक्रमांतर्गत 'धुरंधर', 'उरुम', 'थाई किझवी', 'रुबी-क्यूब', 'बनारस', 'सूर्यमुखी', 'सिंग गीतम', 'ओह माय डॉग', 'पगला घोडा', 'आदि अनंत', 'लालो - कृष्ण सदा सहायते', 'द ग्रेट ग्रँड सुपरहिरो एलियन्स का आगमन', 'बाप्या', 'देऊळ बंद २', 'कृष्णावतारम', 'मन शंकरा वर प्रसाद गारू', 'स्क्रोल', 'कबीर सर का आखरी लेसन', 'प्रत्याबर्तन', 'हनुमान अंश', 'सेव मिच्छर', 'स्लेज', 'द केरळ स्टोरी २ गोज बियॉन्ड', 'चेन्नई लव्ह स्टोरी' आणि 'तिघी' या २५ चित्रपटांचा समावेश आहे.iffi 2026 cinema goa