नेक्सस सीवूड्स मॉलमध्ये ब्लॅक फ्रायडे सेलची धमाल; १०० हून अधिक ब्रँड्सवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत

नवी मुंबईकरांसाठी खरेदीची पर्वणी; २९ नोव्हेंबरपर्यंत आकर्षक ऑफर्स आणि खात्रीशीर बक्षिसांची संधी

    28-Nov-2026

Nexus Seawoods Black Friday Sale 
  
नवी मुंबई : (Nexus Seawoods Black Friday Sale)ब्लॅक फ्रायडे सेल म्हणजे केवळ सवलतींची खरेदी न राहता, भारतीय ग्राहकांसाठीही तो आता एक महत्त्वाचा शॉपिंग इव्हेंट बनला आहे. सणासुदीचा काळ, लग्नसराई आणि वर्षअखेरीच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर यंदा ग्राहकांना खरेदीची विशेष संधी उपलब्ध झाली आहे. याच निमित्ताने नवी मुंबईतील लोकप्रिय शॉपिंग डेस्टिनेशन असलेल्या नेक्सस सीवूड्स मॉलमध्ये २९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ब्लॅक फ्रायडे सेलचे आयोजन करण्यात आले आहे.
 
या सेलमध्ये फॅशन, फुटवेअर, ब्युटी, इलेक्ट्रॉनिक्स, अॅक्सेसरीज, होम डेकोर यांसह विविध श्रेणींमधील १०० हून अधिक ब्रँड्सवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. नव्या कलेक्शनसह आकर्षक स्टायलिंग पर्यायही ग्राहकांना उपलब्ध असतील. त्यामुळे लग्नसराईसाठीचे कपडे, पार्टीवेअर तसेच आगामी सण-समारंभांसाठी आवश्यक खरेदी एकाच ठिकाणी करता येणार आहे.(Nexus Seawoods Black Friday Sale)
 
या सेलचे आणखी एक आकर्षण म्हणजे १० हजार रुपये किंवा त्याहून अधिक खरेदीवर खात्रीशीर बक्षिसे मिळण्याची संधी. एच अँड एम, अझोर्ते, मँगो, आल्डो, टिरा, मॅक्स, मॅक आणि सेफोरा यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सचा या सेलमध्ये समावेश आहे. फॅशन, ब्युटी, फुटवेअर आणि लाइफस्टाइल अशा विविध श्रेणींमध्ये ग्राहकांना आकर्षक ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.
 
वर्षअखेरीचे सेलिब्रेशन आणि लग्नसराईचा हंगाम लक्षात घेऊन या खरेदी महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राहकांना सवलतींचा लाभ घेत आपल्या आवडीच्या वस्तूंची खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.(Nexus Seawoods Black Friday Sale)
 
सेलची माहिती :
कालावधी : २९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत
वेळ :सकाळी १० ते मध्यरात्री
ठिकाण : नेक्सस सीवूड्स मॉल, नवी मुंबई
आकर्षण : १०० हून अधिक ब्रँड्सवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत आणि १० हजार रुपयांच्या खरेदीवर खात्रीशीर बक्षिसे.
 




संबंधित मजकूर