
मुंबई, (Malabar SWAYE Diamond Collection) : मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने ‘SWAYE’ (स्वये) या नैसर्गिक हिऱ्यांच्या नव्या कलेक्शनचे अनावरण केले आहे. सर्पाकृती वळणांपासून प्रेरणा घेतलेल्या या कलेक्शनमध्ये आधुनिक डिझाइन, आकर्षक लूक आणि हलक्या वजनाच्या दागिन्यांचा समावेश आहे. अभिनेत्री आलिया भट्ट या कलेक्शनची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.
‘Diamonds That Move With You’ ही संकल्पना या कलेक्शनच्या केंद्रस्थानी आहे. दैनंदिन वापरापासून ते खास प्रसंगांपर्यंत विविध प्रकारच्या पेहरावांना साजेसे दागिने या संग्रहात उपलब्ध आहेत. लेयरिंग आणि स्टॅकिंगसाठीही हे दागिने उपयुक्त आहेत.(Malabar SWAYE Diamond Collection)
मलाबार ग्रुपचे चेअरमन एम. पी. अहमद यांनी सांगितले की, आजच्या महिलांच्या बदलत्या जीवनशैलीला आणि वैयक्तिक आवडीनिवडींना पूरक ठरतील, अशा दागिन्यांची निर्मिती या कलेक्शनमधून करण्यात आली आहे.
मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या ‘डायमंड प्रॉमिस’ अंतर्गत प्रत्येक हिरा १०० टक्के नैसर्गिक आणि जबाबदारीने मिळवलेला असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच प्रत्येक दागिन्याची २८ गुणवत्ता तपासणी केली जाते. कंपनीच्या मते, ग्राहकांना सोने व हिऱ्यांच्या दागिन्यांच्या एक्स्चेंजवर १०० टक्के मूल्य, पारदर्शक किंमत आणि आजीवन मोफत देखभाल अशा सुविधाही दिल्या जातात.(Malabar SWAYE Diamond Collection)