पुस्तके आपला अपमान न करता अज्ञानाची जाणीव करून देतात; मुंबई पुस्तक महोत्सवात डॉ. दीपक करंजीकर

    28-Nov-2026   

Dr Deepak Karanjikar 
मुंबई (Dr Deepak Karanjikar) : पुस्तक तुम्हाला तुमचा अपमान न करता तुम्हाला काय कळत नाही हे सांगतात, ही पुस्तकांची गंमत आहे, असे सांगताना लेखक, वक्ते, विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि अभिनेते डॉ. दीपक करंजीकर यांनी आपला साहित्य आणि नाट्यक्षेत्रातील प्रवास उलगडला.
 
मुंबई पुस्तक महोत्सव २०२६ मध्ये ‘साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील प्रवास’ या विषयावर आयोजित मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी अमेय रानडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. (Dr Deepak Karanjikar)
डॉ. दीपक करंजीकर म्हणाले की, "ज्या पद्धतीची गर्दी इथे आहे ते पाहून बरे वाटले. देशात जवळपास ६२ टक्के लोकसंख्या ही वय वर्ष ३५ ते ३० च्या आत आहे. त्यामुळे युरोप, अमेरिका यासारख्या देशांमध्ये असलेल्या एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के युवक आपल्याकडे आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा पुस्तक महोत्सव कॉलेज कॅम्पस मध्ये आयोजित करणे हे खूप महत्त्वाचे आहे. याबद्दल मी नॅशनल बुक ट्रस्टचे यांचे जाहीर अभिनंदन करतो. त्यांनी मुळांना पाणी घालण्याचा प्रयत्न केला आहे. आपण फांद्यांना पाणी घालत नाहीत तर मुळांना पाणी घालतो." (Dr Deepak Karanjikar)
 
"पुस्तकांचा पहिला स्पर्श मला धुळ्याला झाला. तिथल्या ग्रंथालयात मी वाचन केले. साहित्यही आपल्याला झेपणारी गोष्ट आहे याची जाणीव निर्माण करण्यात धुळ्याचा हात आहे आणि या मार्गाने आपण जाऊ शकतो हा विश्वास निर्माण करण्यात नाशिकचा हात आहे," असेही त्यांनी सांगितले. (Dr Deepak Karanjikar)
 
यावेळी त्यांनी साहित्य, नाट्य, जागतिक राजकारण, आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि जागतिक स्तरावरील घडामोडींविषयी आपले विचार मांडले. जागतिक राजकारण आणि पडद्यामागील घडामोडींचे अभ्यासक म्हणून त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा केली. तसेच त्यांनी चीनच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘लाल सूत्र’ या आगामी पुस्तकाची माहिती दिली. पुढील दोन वर्षांत आपली चार ते पाच पुस्तके वाचकांच्या भेटीला येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Dr Deepak Karanjikar)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर