
मुंबई : (Rohit Sharma Mumbai Indians Captain) गेल्या काही वर्षांपासून मुंबईकर ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आता जवळ आला आहे. मुंबई इंडियन्सतर्फे रोहित शर्मा पुन्हा एकदा कर्णधारपदी विराजमान झाला आहे. काही दिवसांपूर्वी हार्दिक पंड्याने कर्णधार पदाचावरील आपला दावा सोडला. त्याबद्दल सोशल मीडियावर भरपूर चर्चा झाली. त्यानंतर मुंबईचा कॅप्टन कोण होणार ? याकडे सर्वांचे लक्ष्य लागून होते. रोहित शर्माचा एक व्हिडिओ शेअर करत मुंबई इंडियन्सने याबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम दिला. आता याबद्दल अधिकृत घोषणाच करण्यात आली आहे.
मुंबई आणि रोहितचे खास नाते आहे. २०११मध्ये त्याने कर्णधारपद स्वीकारले. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने एकूण पाच चषक जिंकले. चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि तत्सम बलाढ्य संघापुढे संघाचे मनोबल उंचावण्याचे आव्हान रोहित शर्माने लीलया पेलले होते. मुंबई इंडियन्सच्या फॅन्सशी असलेले घट्ट नाते यामुळे त्याला फॅन्सने 'मुंबईचा राजा' हा किताब बहाल केला होता. हार्दिक पंड्याने मुंबईचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर अनेकांच्या नाराजीचा सामानाही हार्दीकला करावा लागला होता.(Rohit Sharma Mumbai Indians Captain)
यंदा २०२६च्या आयपीएलमध्ये एकूण १४ पैकी केवळ चारच सामने हार्दिकच्या नेतृत्वात संघाला जिंकता आले. यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी घसरला होता. हार्दिक पंड्याला ट्रेड ऑफ करत पंजाबच्या हरदीप सिंहला संघात सामील करुन घेण्यात आले आहे. त्यामुळे आता हार्दिक पंजाबच्या संघात खेळताना दिसेल. पण तो कर्णधार होईल का? याबद्दल अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दरम्यान रोहित शर्माच्या वापसीमुळे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात उत्साहाचे वातावरण आहे.(Rohit Sharma Mumbai Indians Captain)