मिनी पॉल स्मिथ एडिशन भारतात लॉन्च; तीन खास मॉडेल्सची किंमत ५५.७५ लाखांपासून सुरू

    27-Nov-2026

MINI SE


मुंबई :
ब्रिटिश लक्झरी कार उत्पादक मिनीने सुप्रसिद्ध ब्रिटिश फॅशन डिझायनर सर पॉल स्मिथ यांच्या सहकार्याने तयार केलेल्या मिनी पॉल स्मिथ एडीशन सादर केली. या विशेष आवृत्तीमध्ये मिनी कूपर एस, ऑल-इलेक्ट्रिक मिनी कूपर एसई आणि मिनी कनव्हर्टेबल तीन मॉटेल्सचा सामावेश आहे. या अनावरण सोहळ्याप्रसंगी अभिनेत्री करीना कपूरची खास उपस्थिती होती. यावेळी बीएमडब्ल्यू इंडिया समुहाचे अध्यक्ष तथा सीईओ हरदीप सिंह ब्रार आणि संचालक अभिनंदन गोपाळशेट्टी उपस्थित होते.

मिनी पॉल स्मिथ एडीशनची एक्स-शोरूम किंमत ५५.७५ लाख रुपयांपासून सुरू होते. मिनी कूपर एस पॉल स्मिथ एडीशनची किंमत ५५.७५ लाख रुपये, मिनी कन्व्हर्टेबल पॉल स्मिथ एडीशनची किंमत ५६.४० लाख रुपये, तर इलेक्ट्रिक मिनी कूपर एसई पॉल स्मिथ एडीशनची किंमत ६१.५० लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या विशेष आवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणजे मिनीचे आयकॉनिक डिझाइन आणि सर पॉल स्मिथ यांची 'क्लासिक विथ अ ट्विस्ट' ही संकल्पना यांचा अनोखा संगम. कारच्या बाह्य डिझाइनमध्ये मिडनाइट ब्लॅक, इन्स्पायर्ड व्हाइट आणि स्टेटमेंट ग्रे हे रंग उपलब्ध आहेत.
यासोबतच पॉल स्मिथ यांच्या जन्मगावापासून प्रेरित नॉटिंगहॅम ग्रीन रंगाचा वापर करण्यात आला आहे. फ्रंट ग्रिल, रूफ, मिरर कॅप्स आणि हबकॅप्सवर या रंगाचे खास घटक पाहायला मिळतात. कारच्या छतावर पॉल स्मिथ यांच्या प्रसिद्ध रंगीत पट्ट्या, बूटवर त्यांची स्वाक्षरी आणि कारजवळ जाताच दिसणारे 'Hello' LED फ्लोअर प्रोजेक्शन यामुळे या एडिशनला वेगळी ओळख मिळते. इंटिरिअरमध्ये नाइटशेड ब्लू रंगातील स्पोर्ट्स सीट्स, विशेष स्टीयरिंग व्हील, पॉल स्मिथ यांचे 'Every day is a new beginning' हे ब्रीदवाक्य आणि डिजिटल डिस्प्लेसाठी खास थीम देण्यात आली आहे.
कामगिरीच्या बाबतीत MINI Cooper S मध्ये २०४ hp क्षमतेचे ट्विनपॉवर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ३०० Nm टॉर्क निर्माण करते. ही कार अवघ्या ६.६ सेकंदांत ० ते १०० किमी प्रतितास वेग गाठते. दुसरीकडे, इलेक्ट्रिक MINI Cooper SE मध्ये २१८ hp क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर आणि ३३० Nm टॉर्क मिळतो. WLTP प्रमाणपत्रानुसार ही कार एका चार्जमध्ये ४०२ किमीपर्यंतचे अंतर पार करू शकते. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीतही MINI ने विशेष डिझाइन आणि कामगिरीचा संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे.






संबंधित मजकूर