मुंबई, दि. २७ (विशेष प्रतिनिधी) : ब्रिटिश ऑटोमोबाईल ब्रँड असलेल्या MINI ने आपली नवीन पूर्णपणे इलेक्ट्रिक मीनी कूपर एसई भारतीय बाजारपेठेत दाखल झाली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत ५३.९० लाख रुपये आहे. २१८ एचपीची क्षमता आणि एका चार्जमध्ये ४०२ किलोमीटरपर्यंतची रेंज ही या कारची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. देशभरातील मीनीच्या अधिकृत डीलरशिपमध्ये या कारच्या बुकिंगला सुरुवात झाली असून ग्राहकांना तातडीने डिलिव्हरी उपलब्ध होणार आहे. मुंबईत ब्रॅण्ड एम्बेसिटर करीना कपूरच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
नवी मीनी कूपर एसई ही भारतात कम्प्लिटली बिल्ट-अप युनिट (CBU) स्वरूपात उपलब्ध असेल. ही कार 'फेव्हर्ड' ट्रिममध्ये सादर करण्यात आली आहे. ओशन वेव्ह ग्रीन, ब्रिटिश रेसिंग ग्रीन आणि चिली रेड अशा तीन आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध असेल. या इलेक्ट्रिक कारमध्ये ५४.२ किलो किलोवॅट-तास वीज क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी १६० किलो व्हॅट अर्थात २१८ एचपीची कमाल शक्ती आणि ३३० Nm टॉर्क निर्माण करते. त्यामुळे ही कार अवघ्या ६.७ सेकंदांत शून्य ते १०० किमी प्रतितास वेग गाठू शकते. WLTP चाचणी चक्रानुसार ही कार एका चार्जमध्ये ४०२ किलोमीटरपर्यंत धावू शकते. तसेच ९५ kW क्षमतेच्या डीसी फास्ट चार्जरच्या मदतीने केवळ ३० मिनिटांत बॅटरी १० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करता येते.
डिजिटल तंत्रज्ञान आणि आधुनिक इंटिरिअर
या कारच्या इंटिरिअरमध्ये मध्यभागी गोलाकार OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. MINI Operating System 9, 'Hey MINI' व्हॉइस असिस्टंट, नेव्हिगेशन, Apple CarPlay, Android Auto आणि Harman Kardon सराउंड साउंड सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्ये यात आहेत. MINI Digital Key Plus या सुविधेमुळे स्मार्टफोनचा वापर कारची डिजिटल चावी म्हणून करता येतो. याशिवाय हेड-अप डिस्प्ले आणि केबिनमधील फिशआय कॅमेराही देण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या कारमध्ये लेव्हल २ ADAS तंत्रज्ञानाचा समावेश आहे. फ्रंट कोलिजन वॉर्निंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, रिव्हर्सिंग असिस्टंट आणि रिअर क्रॉसिंग ट्रॅफिक वॉर्निंग यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
या लॉन्चिंगबाबत BMW Group India चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हरदीप सिंह ब्रार म्हणाले की, नवीन इलेक्ट्रिक MINI Cooper मध्ये कंपनीची पारंपरिक गो-कार्ट ड्रायव्हिंग अनुभूती, आधुनिक डिझाइन आणि डिजिटल तंत्रज्ञान यांचा मेळ साधण्यात आला आहे. या नव्या मॉडेलमुळे भारतातील MINI ब्रँडच्या ग्राहकवर्गाचा विस्तार होण्याची अपेक्षा आहे. कारसोबत दोन वर्षांची अमर्याद किलोमीटरची वॉरंटी आणि दोन वर्षांची २४x७ रोडसाइड असिस्टन्स सुविधा देण्यात येणार आहे.
मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.