लुप्त सरस्वती नदीच्या रहस्याचा वैज्ञानिक वेध! इफ्फीमध्ये माहितीपटाची चर्चा!

    27-Nov-2026

sarasavti
 
 
 
 
 
 
 
पणजी (विशेष प्रतिनिधी) - iffi 2026 cinema प्राचीन भारतीय संस्कृती, वेदकालीन परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांचा संगम घडवणाऱ्या ‘द अनसीन होली रिव्हर – सरस्वती’ या हिंदी माहितीपटाचे प्रदर्शन ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा विभागात करण्यात आले. जमिनीखाली लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या अस्तित्वाभोवती असलेले रहस्य उलगडण्याचा प्रयत्न या माहितीपटातून करण्यात आला आहे.
सरस्वती नदीचा इतिहास, प्राचीन ग्रंथांमधील तिचे उल्लेख, भौगोलिक संदर्भ आणि आधुनिक वैज्ञानिक संशोधन यांची सांगड या माहितीपटात घालण्यात आली आहे. डॉ. सुभाष सी. सिंह यांनी सरस्वती नदीच्या अस्तित्वासंदर्भात केलेल्या वैज्ञानिक तपासाचाही यात समावेश आहे.iffi 2026 cinema
या माहितीपटाचे दिग्दर्शक भास्कर विश्वनाथन यांनी पत्रकार परिषदेत आपल्या पहिल्याच माहितीपटाच्या निर्मितीचा अनुभव सांगितला. सरस्वती नदीचे गूढ आणि त्यासंदर्भातील संशोधन यामुळे आपण या विषयाकडे आकर्षित झाल्याचे त्यांनी सांगितले. विस्तृत संशोधन सामान्य प्रेक्षकांपर्यंत रंजक, सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने पोहोचवणे हे या निर्मितीतील सर्वात मोठे आव्हान असल्याचेही त्यांनी नमूद केले.iffi 2026 cinema
निर्माते अभिनव एम. जैन यांनीही या माहितीपटामागील प्रेरणा स्पष्ट केली. प्रयागराज येथील कुंभमेळ्याला भेट दिल्यानंतर त्रिवेणी संगमावर गंगा आणि यमुना या दोन नद्या दिसतात, मात्र धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख असलेली तिसरी नदी सरस्वती नेमकी कुठे आहे, या उत्सुकतेतून त्यांनी या विषयाचा शोध घेण्यास सुरुवात केली.iffi 2026 cinema
या संशोधनाच्या वैज्ञानिक बाजूवर भाष्य करताना त्यांनी रुडकी येथील राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेने केलेल्या समस्थानिक अभ्यासाचा उल्लेख केला. पाण्याच्या नमुन्यांच्या तपासणीतून जमिनीखालील जलप्रवाहांच्या जाळ्याबाबत संशोधनाला महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.iffi 2026 cinema
 




संबंधित मजकूर