विस्थापन, आठवणी आणि संघर्षाची हृदयस्पर्शी कहाणी ‘स्कायलार्क’; IFFIमध्ये किर्गिझ चित्रपटाची भारतात पहिली झलक!

    27-Nov-2026
 
sky
 
 
 
 
 
 
पणजी ( विशेष प्रतिनिधी )- iffi 2026 cinema skylark विस्थापन, माणसांच्या आठवणी, कौटुंबिक नाती आणि संघर्षातून उभे राहणाऱ्या माणसांची जिद्द अशा अनेक भावनिक पैलूंचे दर्शन घडवणारा किर्गिझस्तानचा ‘स्कायलार्क’ हा चित्रपट ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष आकर्षण ठरला. आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात या चित्रपटाचा भारतातील पहिला प्रीमियर पार पडला. चित्रपटाच्या दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका नार्घिझा डोटीएवा तसेच निर्मात्या गुलनारा कासमंबेतोवा यांनी पत्रकार परिषदेत चित्रपटाच्या निर्मितीमागील प्रेरणा आणि त्यातील सामाजिक वास्तव उलगडले.
८५ मिनिटांचा हा किर्गिझ भाषेतील चित्रपट सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर मध्य आशियातील सीमारेषांमुळे निर्माण झालेल्या संघर्षावर आधारित आहे. किर्गिझस्तान आणि ताजिकिस्तानच्या सीमाभागात नव्याने आखलेल्या सीमांमुळे शतकानुशतके एकत्र राहणाऱ्या समुदायांमध्ये दुरावा निर्माण झाला. या बदलांचा सामान्य माणसांच्या आयुष्यावर झालेला परिणाम चित्रपटातून मांडण्यात आला आहे.iffi 2026 cinema skylark
दिग्दर्शिका नार्घिझा डोटीएवा यांनी सांगितले की, सीमाभागातील प्रत्यक्ष घटना आणि बातम्यांमधून या चित्रपटाची प्रेरणा मिळाली. तर निर्मात्या गुलनारा कासमंबेतोवा यांनी बॅटकेन परिसरातील बदललेल्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. पूर्वी मोकळेपणाने वापरली जाणारी कुरणे आणि पूर्वजांच्या स्मशानभूमी अचानक प्रतिबंधित क्षेत्र बनल्याने स्थानिकांच्या जीवनात मोठे बदल घडले.iffi 2026 cinema skylark
‘स्कायलार्क’ या शीर्षकाला किर्गिझ लोककथांमध्ये विशेष महत्त्व आहे. मेंढीच्या पाठीवर शांतपणे घरटे बांधणारा स्कायलार्क पक्षी हा शांतता आणि सौहार्दाचे प्रतीक मानला जातो. संघर्षाच्या परिस्थितीतही माणसांमधील सहअस्तित्व आणि जगण्याची जिद्द या प्रतीकातून अधोरेखित करण्यात आली आहे.iffi 2026 cinema skylark
राज कपूर आणि मिथुन चक्रवर्तींच्या चित्रपटांच्या आठवणी!
या पत्रकार परिषदेत भारत आणि किर्गिझस्तान यांच्यातील सांस्कृतिक नात्यांचाही विशेष उल्लेख झाला. सोव्हिएत काळात किर्गिझस्तानमध्ये भारतीय चित्रपट प्रचंड लोकप्रिय होते. दिग्दर्शिका आणि निर्मात्यांनी बालपणी कुटुंबासोबत पाहिलेल्या हिंदी चित्रपटांच्या आठवणी सांगितल्या.iffi 2026 cinema skylark
विशेषतः मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ चित्रपटातील गाण्यांवर परिसरातील मुले एकत्र येऊन नाचायची आणि गाणी गायची, अशी आठवण त्यांनी सांगितली. राज कपूर यांचे चित्रपट, अमिताभ बच्चन यांचे सिनेमे आणि भारतीय चित्रपटांमधील भावना, प्रेम, नातेसंबंध यांचा किर्गिझ समाजावर मोठा प्रभाव पडल्याचे त्यांनी नमूद केले.iffi 2026 cinema skylark
भारतीय चित्रपटांनी तत्कालीन समाजाला भावनांच्या अभिव्यक्तीची एक वेगळी खिडकी खुली करून दिली होती, असेही त्यांनी सांगितले.
iffi 2026 cinema skylark
सीमारेषा केवळ भूगोल बदलत नाहीत, तर माणसांची नाती, आठवणी आणि आयुष्यही बदलतात, हा महत्त्वपूर्ण विचार ‘स्कायलार्क’मधून मांडण्यात आला आहे. त्यामुळे IFFIमधील या चित्रपटाची उपस्थिती जागतिक सिनेमाच्या मानवी संवेदनशीलतेचा वेध घेणारी ठरली.iffi 2026 cinema skylark




संबंधित मजकूर