मराठीतील पहिला AI चित्रपट ‘बागल बुवा’चे IFFIमध्ये अनोखे प्रमोशन!

    27-Nov-2026
 
bagal
 
पणजी (कपिल देशपांडे )- iffi 2026 cinema bagalbuwa ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठीतील पहिला AI चित्रपट म्हणून चर्चेत असलेल्या ‘बागल बुवा’चे अनोख्या पद्धतीने प्रमोशन करण्यात आले. चित्रपटाचे दिग्दर्शक चेतन छावडा आणि निर्माते शरद पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रमोशनल उपक्रम पार पडला. विशेष म्हणजे, या चित्रपटात अभिजीत खांडकेकर यांच्यासह तब्बल ५६ कलाकारांची झलक पाहायला मिळणार आहे.
IFFIच्या परिसरात ‘बागल बुवा’चे पोस्टर्स लावण्यात आले होते. तसेच व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून चित्रपटातील कलाकारांची आणि चित्रपटाची झलक प्रेक्षकांसमोर आणण्यात आली. महोत्सवाला भेट देणाऱ्या देश-विदेशातील चित्रपटप्रेमींचे लक्ष वेधून घेण्यासाठी या माध्यमांचा वापर करण्यात आला.iffi 2026 cinema bagalbuwa
अभिजीत खांडकेकर यांच्यासह ५६ कलाकारांचा सहभाग ही या चित्रपटाची विशेष आकर्षणाची बाब ठरणार आहे. एवढ्या मोठ्या कलाकारसंचाची झलक AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या प्रमोशनमधून करण्यात आलाiffi 2026 cinema bagalbuwa .
आज जागतिक चित्रपटसृष्टीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात AI चा वापर वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत मराठी चित्रपटसृष्टीतही या तंत्रज्ञानाचा वापर करून वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न ‘बागल बुवा’च्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निर्मितीइतकेच त्याचे प्रमोशनही उत्सुकतेचा विषय ठरत आहे.iffi 2026 cinema bagalbuwa
IFFIसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मराठीतील अशा प्रयोगाची उपस्थिती ही मराठी चित्रपटसृष्टीतील बदलत्या तांत्रिक प्रवाहाची नोंद घेणारी ठरते. ‘बागल बुवा’च्या माध्यमातून AI आणि मनोरंजन यांचा मेळ प्रेक्षकांना कसा अनुभवायला मिळणार, याची उत्सुकता आता वाढली.iffi 2026 cinema bagalbuwa
 




संबंधित मजकूर