मुंबई, (Bikaji Mahè Bakery Brand): भारतातील आघाडीच्या पारंपरिक स्नॅक्स ब्रँड्सपैकी एक असलेल्या बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेडने आपल्या खाद्यपदार्थांच्या श्रेणीचा विस्तार करत प्रीमियम बेकरी क्षेत्रात प्रवेश केला आहे. कंपनीने ‘बिकाजी बेक्स’ या उपक्रमांतर्गत ‘माहे’ (Mahè) या युरोपियन शैलीतील बेकरी ब्रँडची सुरुवात केली आहे. प्रसिद्ध मास्टर बेकर टी. के. खलील यांच्यासोबतच्या भागीदारीतून हा ब्रँड साकारण्यात आला आहे. युरोपियन बेकिंग परंपरा, पारंपरिक बेकिंग कौशल्य आणि आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान यांचा संगम ‘माहे’च्या माध्यमातून साधण्यात आला आहे. कंपनीच्या व्यवसाय विस्तार आणि नवीन खाद्यपदार्थांच्या श्रेणींमध्ये आपले स्थान निर्माण करण्याच्या धोरणातील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
२५ ते २७ नोव्हेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘बेकरी बिझ मुंबई’ या प्रदर्शनात ‘माहे’ ब्रँडचे अनावरण करण्यात येणार आहे. या माध्यमातून बिकाजीने व्यावसायिक बेकरी आणि फूड सर्व्हिस क्षेत्रात प्रवेश केला आहे. हे क्षेत्र विशेष तांत्रिक कौशल्य, उत्पादन क्षमता आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांची सखोल समज यांची मागणी करणारे आहे. ‘बिकाजी बेक्स’च्या माध्यमातून कंपनी अन्नपदार्थ उत्पादन आणि वितरण क्षेत्रातील आपला अनुभव तसेच पारंपरिक बेकिंगमधील विशेष कौशल्य यांची सांगड घालत या क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे.(Bikaji Mahè Bakery Brand)
या नव्या उपक्रमाबाबत बोलताना बिकाजी फूड्स इंटरनॅशनल लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. दीपक अग्रवाल म्हणाले, “ग्राहकांच्या आवडीनिवडी समजून घेऊन त्यांच्या बदलत्या चवीनुसार खाद्यपदार्थ सादर करण्याच्या दृष्टिकोनातून बिकाजीने आजवर आपला व्यवसाय विस्तारला आहे. आमच्या पारंपरिक उत्पादन श्रेणींच्या पलीकडे जाऊन व्यवसायाचा विस्तार करताना बेकरी क्षेत्रात आम्हाला मोठी संधी दिसत आहे. ‘बिकाजी बेक्स’ आणि ‘माहे’च्या माध्यमातून आम्ही बिकाजीचा खाद्य व्यवसायातील अनुभव आणि टी. के. खलील यांचे विशेष कौशल्य एकत्र आणत आहोत. नवीन क्षेत्रात प्रवेश करताना त्या क्षेत्रातील कला, प्रक्रिया आणि ग्राहकांच्या अपेक्षांचा आदर करणे महत्त्वाचे असते, याची आम्हाला जाणीव आहे. या भागीदारीतून या क्षेत्रात दीर्घकालीन आणि अर्थपूर्ण प्रगती साधण्यासाठी आवश्यक कौशल्य आणि क्षमता विकसित करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब दिसते.”
‘माहे’ ब्रँडच्या केंद्रस्थानी आहेत मास्टर बेकर टी. के. खलील. बेकरी उद्योगातील त्यांचा अनुभव चार दशकांहून अधिक आहे. कतारमध्ये युरोपियन मास्टर बेकर्सकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मध्यपूर्वेतील विविध बेकरी व्यवसायांची स्थापना आणि विकास केला. आता ‘माहे’च्या माध्यमातून ते युरोपियन बेकिंग परंपरा आणि आधुनिक उत्पादन पद्धतींमधील आपले प्रदीर्घ अनुभव आणि कौशल्य भारतात घेऊन येत आहेत.(Bikaji Mahè Bakery Brand)
बेकिंगविषयीचा आपला दृष्टिकोन मांडताना ‘माहे’चे मास्टर बेकर टी. के. खलील म्हणाले, “बेकिंगचे भविष्य हे परंपरा आणि तंत्रज्ञान यापैकी एकाची निवड करण्यामध्ये नाही, तर या दोन्हींचा योग्य समन्वय साधण्यात आहे. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे पारंपरिक कौशल्य अधिक समृद्ध व्हावे; मात्र बेकिंगला विशेष बनवणारा मानवी स्पर्श कधीही हरवता कामा नये.”
‘माहे’च्या उत्पादन श्रेणीमध्ये प्रीमियम युरोपियन व्हिएनोझरी (Viennoiseries), आर्टिसन ब्रेड्स, न्याहारीसाठीचे बेकरी पदार्थ, विविध चविष्ट स्नॅक्स आणि केक्स यांचा समावेश असेल. याशिवाय शेफ आणि फूड सर्व्हिस व्यावसायिकांसाठी विशेष ‘नेकेड’ बेस उत्पादनेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या उत्पादनांच्या माध्यमातून शेफना त्यांच्या पाककृती आणि गरजांनुसार स्वतःच्या पद्धतीने पदार्थ तयार करण्याची व त्यांना अंतिम स्वरूप देण्याची सुविधा मिळेल.(Bikaji Mahè Bakery Brand)
या उपक्रमाला कर्नाटकमधील अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे पाठबळ लाभले आहे. पारंपरिक बेकिंग प्रक्रिया आणि नियोजनबद्ध उत्पादन क्षमता यांचा समन्वय साधण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या सुविधेमुळे उत्पादनांचा दर्जा आणि सातत्य कायम राखत ‘माहे’ला किरकोळ ग्राहक तसेच फूड सर्व्हिस क्षेत्रातील व्यावसायिकांच्या गरजा पूर्ण करणे आणि व्यवसायाचा विस्तार करणे शक्य होणार आहे.
‘बिकाजी बेक्स’च्या माध्यमातून कंपनी आपल्या प्रस्थापित उत्पादन आणि वितरण क्षमतांचा लाभ घेत नवीन खाद्यपदार्थांच्या श्रेणींमध्ये विस्तार करण्यासाठी एक मजबूत व्यासपीठ उभारत आहे. या प्रवासातील ‘माहे’ हा एक महत्त्वाचा टप्पा असून, भारतातील प्रीमियम रिटेल बेकरी आणि फूड सर्व्हिस क्षेत्रात व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.(Bikaji Mahè Bakery Brand)