'आता होऊ दे धिंगाणा’ पाहून पुण्याच्या श्रीदेवी लालसंगी जिंकल्या सोन्याचं नाणं!

    26-Nov-2026

dhingana
 
 
 
 
 
 
मुंबई - Siddharth Jadhav star pravahस्टार प्रवाहच्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ या धिंगाणेबाज कार्यक्रमाने महाराष्ट्राच्या घराघरांत आनंद आणि विरंगुळ्याचे क्षण पोहोचवले आहेत. या कार्यक्रमाच्या पाचही पर्वांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. प्रेक्षकांच्या याच प्रेमाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्टार प्रवाहने सर्वोत्कृष्ट धिंगाणेबाज प्रेक्षक निवडण्याची एक खास स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत पुण्याच्या श्रीदेवी लालसंगी यांनी बाजी मारत एक तोळ्याचं सोन्याचं नाणं जिंकण्याचा मान मिळवला.‘आता होऊ दे धिंगाणा’च्या आठ आठवड्यांमध्ये विचारण्यात आलेल्या आठ प्रश्नांची अचूक उत्तरं देत श्रीदेवी यांनी आपल्या आवडत्या कार्यक्रमाशी असलेलं नातं आणि त्यावरील प्रेम सिद्ध केलं. त्यांच्या या उत्साहाला आणि सहभागाला मिळालेली ही सोनेरी भेट त्यांच्या आनंदात भर घालणारी ठरली. कार्यक्रमाचा लाडका होस्ट सिद्धार्थ जाधव याच्या हस्ते सोन्याचं नाणं स्वीकारताना श्रीदेवी भावूक झाल्या. आपल्या आवडत्या कार्यक्रमामुळे मिळालेला हा अविस्मरणीय क्षण त्यांच्यासाठी केवळ बक्षीस नसून, स्टार प्रवाहसोबत जोडलेल्या आनंदाच्या आठवणींची अनमोल भेट ठरला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेकदा ठरवूनही सोनं खरेदी करणं शक्य झालं नाही. मात्र आता होऊ दे धिंगाणामुळे हे स्वप्न सत्यात उतरल्याची भावना श्रीदेवी यांनी व्यक्त केली.
प्रेक्षक आणि वाहिनी यांचं नातं हे केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित नसतं तर त्यात भावनांचा, आपलेपणाचा आणि असंख्य आठवणींचा धागा गुंफलेला असतो. ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या माध्यमातून स्टार प्रवाहने प्रेक्षकांच्या या प्रेमाला एका खास भेटीच्या रूपात दिलेली ही पोचपावती आहे.Siddharth Jadhav star pravah
 




संबंधित मजकूर