वैदेही आणि प्रियदर्शिनीची 'फुलवरा'मधील अस्सल मराठमोळी झलक आली समोर !

    26-Nov-2026

vaidehi
 
 
 
 
 
 
मुंबई -Phulvara Ravi jadhav Vaidehi Parshuram Priyadarshini Indalkari लावणीच्या अदाकारीतून मराठी मातीचा साज खुलवणाऱ्या दोन चेहऱ्यांभोवती गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेल्या उत्सुकतेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि रवी जाधव दिग्दर्शित ‘फुलवरा’ या आगामी चित्रपटातील वैदेही परशुरामी म्हणजेच मथुरा परितेकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर म्हणजेच संगीता परितेकर यांचे लावणीमय रूप नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून समोर आले आहे. विशेष म्हणजे, या दोघींच्या रूपाची ही पहिली झलक चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारी ठरत आहे.
‘नटरंग’नंतर तब्बल १६ वर्षांनी झी स्टुडिओज आणि रवी जाधव ही जोडी पुन्हा एकदा तमाशा आणि लावणीच्या विश्वात प्रेक्षकांना घेऊन जाणार आहे. ‘फुलवरा’च्या माध्यमातून लावणीचा पारंपरिक बाज, कलावंतांचे आयुष्य आणि या कलेसाठी त्यांनी घेतलेला संघर्ष मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या व्यक्तिरेखांबद्दल कमालीची गुप्तता राखण्यात आली होती. आता त्यांच्या व्यक्तिरेखा समोर आल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.Phulvara Ravi jadhav Vaidehi Parshuram Priyadarshini Indalkari
दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात, “लावणी ही महाराष्ट्राची ओळख अभिमानाने मिरवणारी लोककला आहे. ‘फुलवरा’तील या दोन कलाकारांचे रूप समोर आणणे आमच्यासाठी विशेष महत्त्वाचे होते. हे केवळ चेहरा अनावरण नसून आपल्या मातीतल्या कलेला आणि तिचा वारसा जपणाऱ्या कलावंतांना दिलेली मानवंदना आहे.”Phulvara Ravi jadhav Vaidehi Parshuram Priyadarshini Indalkari
वैदेही परशुरामी आपल्या या अनुभवाबद्दल म्हणाली, “लावणी ही केवळ नृत्याची शैली नाही, तर तिच्या प्रत्येक अदाकारीमागे एक स्वतंत्र भावविश्व, ताकद आणि आत्मभान दडलेलं आहे. ‘फुलवरा’मधील माझी व्यक्तिरेखा साकारताना या कलेचा बारकाईने अभ्यास करण्याची आणि स्वतःला नव्याने घडवण्याची संधी मिळाली. या भूमिकेने अभिनेत्री म्हणून माझ्यासमोर अनेक नवी आव्हानं उभी केली, पण त्याचबरोबर खूप काही शिकवलंही. आजवर प्रेक्षकांनी मला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे; मात्र ‘फुलवरा’मधील माझं हे रूप त्यांच्यासाठी नक्कीच वेगळं ठरेल.”Phulvara Ravi jadhav Vaidehi Parshuram Priyadarshini Indalkari
तर प्रियदर्शिनी इंदलकर म्हणते, “एखाद्या भूमिकेचा पहिला लूक प्रेक्षकांसमोर येतो, तेव्हा कलाकारासाठी तो क्षण नेहमीच खास असतो. ‘फुलवरा’च्या बाबतीत हा अनुभव अधिकच अविस्मरणीय आहे. कारण हा केवळ माझ्या व्यक्तिरेखेचा चेहरा समोर येण्याचा क्षण नसून, एका समृद्ध लोककलेच्या परंपरेशी जोडल्या गेलेल्या प्रवासाची सुरुवात आहे. लावणीच्या विश्वात प्रवेश करताना तिचा डौल, तिच्यातील नजाकत आणि त्यामागची मेहनत जवळून अनुभवता आली. प्रेक्षकांनी आजवर माझ्या कामाला दिलेलं प्रेम लक्षात घेता, माझं हे नवं रूप त्यांच्यासाठी एक सुखद धक्का ठरेल, अशी आशा आहे.’’Phulvara Ravi jadhav Vaidehi Parshuram Priyadarshini Indalkari
झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित ‘फुलवरा’ हा चित्रपट १४ जानेवारी २०२७ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. लावणीचा नजाकतदार ठसका, तमाशाच्या फडातील रंगत आणि मराठी संस्कृतीचा अभिमान घेऊन येणाऱ्या या चित्रपटाची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. याशिवाय यामध्ये आणखी कोणकोणते कलाकार असतील याबद्दलची उत्कंठासुद्धा निर्माण झाली असून नव्या वर्षात मोठ्या पडद्यावर रंगणाऱ्या या लावणीच्या संगीतबारीची चाहूल आता लागली आहे!Phulvara Ravi jadhav Vaidehi Parshuram Priyadarshini Indalkari
 




संबंधित मजकूर