नवी मुंबईकरांनो, शुक्रवारी पाणीपुरवठा बंद; शनिवारीही कमी दाबाने पाणी!

मुख्य जलवाहिनीवरील कामासाठी १२ तासांचा शटडाऊन; बेलापूर ते ऐरोलीसह खारघर आणि कामोठेही प्रभावित

    26-Nov-2026

Navi Mumbai Water Supply Shutdown
 
नवी मुंबई,(Navi Mumbai Water Supply Shutdown) :नवी मुंबईकरांना शुक्रवारी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मुख्य जलवाहिनीवरील वितरण व्यवस्थेत नवीन फ्लो मीटर आणि व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कामाचा परिणाम शनिवारीही जाणवणार असून सकाळी आणि संध्याकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
 
बेलापूर ते ऐरोलीदरम्यान मुख्य जलवाहिनीच्या टॅपिंगवरील वितरण वाहिन्या तसेच विविध ठिकाणच्या ईएसआर आणि जीएसआरमध्ये नवीन फ्लो मीटर व व्हॉल्व बसविण्याचे काम महापालिकेमार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी मुख्य जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Navi Mumbai Water Supply Shutdown)
 
पुढील विभागांना फटका
 
या शटडाऊनमुळे बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या नवी मुंबईतील विभागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय मुख्य जलवाहिनीवरील थेट नळजोडण्या तसेच सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे नोडलाही याचा फटका बसणार आहे.
 
शुक्रवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील, तर शनिवारी (२८ नोव्हेंबर) सकाळी आणि संध्याकाळी कमी दाबाने पाणी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.(Navi Mumbai Water Supply Shutdown)
 




संबंधित मजकूर