मुंबई (Khashaba jhimma 3 Nagraj Manjule Hemant Dhome) : मराठी चित्रपटसृष्टीत आगामी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांवरून स्पर्धेचे वातावरण निर्माण होत असताना ‘झिम्मा ३’च्या टीमने मात्र आपल्या प्रदर्शनाच्या तारखेवर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे, नागराज मंजुळे यांच्या बहुचर्चित ‘खाशाबा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतरही ‘झिम्मा ३’च्या प्रदर्शनाच्या नियोजनात कोणताही बदल झालेला दिसत नाही.
२१ मार्च रोजी ‘झिम्मा ३’चे पहिले पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. याच पोस्टरच्या माध्यमातून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली. १ जानेवारी २०२७ रोजी ‘झिम्मा ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांना ‘झिम्मा’च्या मनोरंजनाची मेजवानी मिळणार असल्याने या घोषणेने चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली. Khashaba jhimma 3 Nagraj Manjule Hemant Dhome
त्यानंतर तब्बल चार महिन्यांनी, २ जुलै रोजी नागराज मंजुळे यांच्या ‘खाशाबा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. दोन मोठ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखांमुळे बॉक्स ऑफिसवरील संभाव्य स्पर्धेची चर्चा सुरू झाली. मात्र, या घडामोडीनंतरही ‘झिम्मा ३’च्या टीमने आपल्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्याचे संकेत दिले नाहीत. Khashaba jhimma 3 Nagraj Manjule Hemant Dhome
दरम्यान, १ ऑगस्ट रोजी ‘झिम्मा ३’चे दुसरे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. याशिवाय जाहीर केलेल्या प्रदर्शनाच्या तारखेनुसार चित्रपटाचे प्रमोशनही सुरू करण्यात आले. त्यामुळे १ जानेवारी २०२७ या तारखेवर निर्माते ठाम असल्याचे दिसून येत आहे.Khashaba jhimma 3 Nagraj Manjule Hemant Dhome
एकीकडे नागराज मंजुळे यांचा ‘खाशाबा’ आणि दुसरीकडे ‘झिम्मा’सारख्या लोकप्रिय फ्रँचायझीचा तिसरा भाग अशा दोन चित्रपटांमुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. मात्र, या दोन चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर नेमकी कशी टक्कर होणार, प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला अधिक पसंती देणार आणि प्रदर्शनाच्या तारखांमध्ये पुढे काही बदल होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.Khashaba jhimma 3 Nagraj Manjule Hemant Dhome
मराठी चित्रपटसृष्टीत अनेकदा प्रदर्शनाच्या तारखांमध्ये ऐनवेळी बदल होताना दिसतात. अशा परिस्थितीत कोण आपली प्रदर्शनाची तारीख बदलतो याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे..Khashaba jhimma 3 Nagraj Manjule Hemant Dhome