महामार्ग बनला धावपट्टी! लष्कराच्या विमानांचे यशस्वी लँडिंग; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती


Indian Army Highway Landing
 
मुंबई, (Indian Army Highway Landing):भारतीय लष्कर आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उत्कृष्ट समन्वयाचे ऐतिहासिक उदाहरण घालून दिले आहे. गुजरातमधील अमृतसर-जामनगर आर्थिक महामार्गावर (NH-754A) भारतीय लष्कराच्या ‘टीम माउंटन ईगल्स’च्या चार मायक्रोलाइट विमानांनी यशस्वी लँडिंग आणि टेकऑफ केले. ‘विंग्स ऑफ व्हॅलर अँड युनिटी एक्स्पेडिशन’अंतर्गत हे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशलमिडीयावर प्रात्यक्षिकचा व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली.
 
गुजरातमधील अमृतसर-जामनगर आर्थिक महामार्गाच्या किलोमीटर ९४६ ते ९४९ या तीन किलोमीटरच्या पट्ट्यावर ही मोहीम पार पडली. महामार्गावर लष्करी विमानांचे यशस्वी लँडिंग आणि पुन्हा उड्डाण करण्याची ही कामगिरी भारतीय लष्कर आणि एनएचएआय यांच्यातील नियोजन, समन्वय आणि कार्यक्षमतेचे प्रतीक ठरली आहे.(Indian Army Highway Landing)
 
केंद्रीय मनातरी नितीन गडकरी यांनी सांगितले की, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय तसेच एनएचएआयकडून विकसित करण्यात येणाऱ्या आधुनिक महामार्गांचे सामरिक आणि आपत्कालीन महत्त्व या प्रात्यक्षिकातून अधोरेखित झाले आहे. महामार्ग केवळ वाहतूक आणि दळणवळणासाठीच नव्हे, तर गरज पडल्यास सशस्त्र दलांच्या सामरिक आणि परिचालनविषयक गरजा पूर्ण करण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतात, हे या उपक्रमाने दाखवून दिले. याशिवाय, योग्य सुरक्षा उपाययोजना आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वयाच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गांचा उपयोग साहसी विमान उपक्रम, पर्यटन आणि इतर नव्या उपक्रमांसाठी करण्याची क्षमताही यातून स्पष्ट झाली आहे.(Indian Army Highway Landing)
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सक्षम, सुरक्षित आणि भविष्यातील गरजा पूर्ण करणारे महामार्गांचे जाळे उभारण्यावर भर दिला जात आहे. देशाच्या आर्थिक विकासासोबतच संरक्षण, सामरिक सुरक्षा आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.(Indian Army Highway Landing)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर