आदि अनंत’मधून दोन पिढ्यांमधील नात्यांचा भावस्पर्शी प्रवास! प्रेम, आपुलकी आणि काळजी घेण्याच्या वास्तववादी पैलूंचे चित्रण!

    26-Nov-2026

mahesh
 
 
 
 
पणजी (विशेष प्रतिनिधी ) : iffi 2026 cinema mahesh limaye aadi anantआजच्या धावपळीच्या जीवनात कौटुंबिक नाती, जबाबदाऱ्या आणि यशाच्या मागे धावताना हरवत चाललेली आपुलकी यांचा वेध घेणारा ‘आदि अनंत’ हा मराठी चित्रपट ५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष लक्ष वेधून घेत आहे. महेश लिमये दिग्दर्शित या चित्रपटाची ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात निवड झाली असून, चित्रपटाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी निर्मितीप्रवास उलगडला.
यावेळी महेश लिमये म्हणाले की, आदित्य आणि अनंतराव ही दोन्ही पात्रे आर्थिक तसेच वैयक्तिक आव्हानांचा सामना करत असतात. त्यांच्यातील प्रेम, हलकाफुलका विनोद आणि एकमेकांना दिलेला आधार यातून ही कथा उलगडते. मात्र, एका अपघातामुळे अनंतराव आजारी पडतात आणि त्यांच्या नात्याला वेगळे वळण मिळते. आजोबांची काळजी घेण्याची जबाबदारी आणि स्वतःच्या अभिनय क्षेत्रातील महत्त्वाकांक्षा यामध्ये आदित्यची ओढाताण सुरू होते.iffi 2026 cinema mahesh limaye aadi anant
या परिस्थितीतून निर्माण होणारा ताण, निराशा आणि भावनिक संघर्ष चित्रपटात वास्तववादी पद्धतीने मांडण्यात आला आहे. कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडताना काळजी घेणाऱ्या व्यक्तींकडे होणारे दुर्लक्ष, तसेच आजच्या काळात यशाची नेमकी व्याख्या काय असावी, यावरही चित्रपट भाष्य करतो.
iffi 2026 cinema mahesh limaye aadi anant
या चित्रपटाची पटकथा पहिल्यांदा ऐकली तेव्हा संकर्षण कऱ्हाडे भावूक झाले होते, असा अनुभवही लिमये यांनी सांगितला. त्यावेळी त्यांना स्वतःच्या वडिलांच्या आयुष्यातील अखेरच्या दिवसांत केलेल्या सेवेची आठवण झाली होती. त्यामुळे ही कथा केवळ चित्रपटापुरती मर्यादित नसून अनेक कुटुंबांच्या आयुष्यातील भावनिक अनुभवांचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी नमूद केले.iffi 2026 cinema mahesh limaye aadi anant
 




संबंधित मजकूर