तीन दिग्गज स्वरांची जादू! के. एस. चित्रा यांनी उलगडल्या लता, आशा आणि जानकी यांच्या आठवणी!

    26-Nov-2026

chitra
 
 
 पणजी (विशेष प्रतिनिधी ) - काही आवाज केवळ गाणी गात नाहीत, तर ते पिढ्यान्पिढ्यांच्या आठवणींचा अविभाज्य भाग बनतात. बालपणापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हे सूर आपली साथ देत असतात. शब्दांत व्यक्त न होणाऱ्या भावना संगीताच्या माध्यमातून सहज पोहोचतात. याच संगीताच्या भावविश्वाचा अनुभव ५७ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) उपस्थितांना घेता आला. ज्येष्ठ पार्श्वगायिका के. एस. चित्रा यांनी भारताच्या संगीतविश्वातील दिग्गज गायिका लता मंगेशकर, आशा भोसले आणि एस. जानकी यांच्या आठवणींना उजाळा देत आपल्या संगीतप्रवासातील अनेक हृद्य प्रसंग उलगडले.iffi 2026 cinema goa chitra lata mangeshkar
इफ्फीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'लता मंगेशकर टॉक : द व्हॉइस दॅट इकोज फॉरेव्हर – इन द मेमरी ऑफ आशा भोसले अँड एस. जानकी' या विशेष संवादात्मक सत्रात चित्रा यांनी सहभाग घेतला. अभिनेत्री आणि दिग्दर्शिका सुहासिनी मणिरत्नम यांनी या संवादाचे सूत्रसंचालन केले. हा कार्यक्रम केवळ संगीताविषयीचा चर्चासत्र नव्हता, तर तीन दिग्गज गायिकांच्या सुरेल कारकिर्दीचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भावस्पर्शी प्रवास ठरला.iffi 2026 cinema goa chitra lata mangeshkar
या संवादात चित्रा यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. त्यांचे बालपण संगीताचे वातावरण असलेल्या कुटुंबात गेले. विविध गायन स्पर्धांमध्ये सहभाग घेताना त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षणही घेतले. गाणे हीच आपली जमेची बाजू असल्याचे त्यांना माहीत होते; मात्र संगीत क्षेत्रात इतका मोठा प्रवास घडेल, अशी कल्पना त्यांनी कधी केली नव्हती. मनोरंजन क्लबमधील कार्यक्रमांमध्ये चित्रपटगीते सादर करताना त्यांच्या पार्श्वगायनाच्या प्रवासाची सुरुवात झाली. सुरुवातीला त्या प्रामुख्याने पी. सुशीला यांच्या लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करत असत.iffi 2026 cinema goa chitra lata mangeshkar
आपल्या आवडत्या गायिकांविषयी बोलताना चित्रा यांनी पी. सुशीला, एस. जानकी आणि लता मंगेशकर यांची नावे आवर्जून घेतली. लहानपणी त्या एस. जानकी यांच्या गायनशैलीची नक्कल करण्याचाही प्रयत्न करत असत. मात्र जानकी यांच्या आवाजातील वेगळेपण आणि गायकीची शैली आत्मसात करणे किती कठीण आहे, हेही त्यांनी हसत हसत सांगितले.iffi 2026 cinema goa chitra lata mangeshkar
लता मंगेशकर यांच्या गायनातील भावनिक खोलीचा विशेष उल्लेख करताना चित्रा यांनी त्यांच्या भक्तिगीतांविषयीची आपली आस्था व्यक्त केली. लतादीदींच्या आवाजातील भक्तिभाव आणि गाण्यांमधून व्यक्त होणाऱ्या भावना मनाला थेट स्पर्श करतात, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी लता मंगेशकर यांचे एक आवडते गीतही उपस्थितांसमोर सादर केले.iffi 2026 cinema goa chitra lata mangeshkar
आशा भोसले यांच्या आठवणी सांगताना चित्रा यांच्या बोलण्यात विशेष आदर आणि कौतुक जाणवत होते. आशाताईंची गायकी केवळ एका संगीतप्रकारापुरती मर्यादित नव्हती. विविध संगीतप्रकारांमध्ये प्रयोग करण्याची त्यांची क्षमता विलक्षण होती. गझलसारख्या संगीतप्रकारातही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती, असे चित्रा यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आशा भोसले यांनी लोकप्रिय केलेल्या एका गझलेची काही ओळी गुणगुणून दाखवल्या.iffi 2026 cinema goa chitra lata mangeshkar
लता मंगेशकर यांच्याशी तुलना होण्यापेक्षा स्वतःची स्वतंत्र संगीत ओळख निर्माण करण्याची आशा भोसले यांची इच्छा होती, असा किस्साही त्यांनी सांगितला. आशाताईंशी झालेल्या पहिल्या भेटीचा प्रसंगही त्यांनी आठवला. चित्रा यांचे गायन ऐकल्यानंतर आशाताईंनी त्यांना इतक्या उंच पट्टीत का गाता, असा प्रश्न विचारला होता. या छोट्याशा प्रसंगातून आशाताईंचा स्पष्टवक्तेपणा आणि स्वतंत्र विचारसरणी दिसून येते, असे चित्रा यांच्या आठवणींतून अधोरेखित झाले.iffi 2026 cinema goa chitra lata mangeshkar
एस. जानकी यांच्याविषयी बोलताना चित्रा भावूक झाल्या. जानकी यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीतील एक रंजक प्रसंग त्यांनी सांगितला. त्या काळात विविध कार्यक्रमांमध्ये मिमिक्री कलाकारांचे सादरीकरण होत असे. या कलाकारांच्या सादरीकरणादरम्यान काही वेळ रिकामा राहिल्यास जानकी यांना गाण्यासाठी आमंत्रित केले जात असे. अशा कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना त्यांच्या आवाजाची ओळख होऊ लागली आणि पुढे त्यांचा पार्श्वगायनातील प्रवास अधिक बहरत गेला.
iffi 2026 cinema goa chitra lata mangeshkar
जानकी यांच्या आवाजातील वैशिष्ट्यपूर्ण चढ-उतार, भावपूर्ण गायकी आणि प्रत्येक गाण्याला जिवंत करण्याची त्यांची क्षमता यांचे चित्रा यांनी कौतुक केले. मात्र संगीतापलीकडेही जानकी यांच्याशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे नाते होते. चित्रा यांनी त्यांना आईच्या मायेची अनुभूती देणारी व्यक्ती म्हणून संबोधले. जानकी यांच्या घरी गेल्यानंतर त्या स्वतःच्या हाताने प्रेमाने जेवण भरवत असत, ही आठवण सांगताना चित्रा यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यांच्या हातचे तिखट जेवणही प्रेमामुळे गोड लागायचे, असे त्या म्हणाल्या.
iffi 2026 cinema goa chitra lata mangeshkar
या संवादादरम्यान सुहासिनी मणिरत्नम यांनी चित्रपटसंगीताचा मानवी भावविश्वाशी असलेला संबंध अधोरेखित केला. प्रेम, लग्न, दुःख, आनंद अशा आयुष्यातील प्रत्येक भावनेला चित्रपटातील गाणी शब्दांपलीकडे जाऊन व्यक्त करतात, असे त्यांनी सांगितले. यावेळी चित्रा यांनी मल्याळम भाषेतील 'स्वर्णमुखिले' हे गाणे ऐकताना आजही आपले डोळे पाणावतात, अशी भावनिक कबुली दिली.iffi 2026 cinema goa chitra lata mangeshkar
कार्यक्रमात एक रंजक संगीत प्रश्नमंजूषाही आयोजित करण्यात आली होती. पार्श्वसंगीताशिवाय चित्रपटांमधील दृश्ये दाखवण्यात आली आणि त्या दृश्यांमधील गाणी ओळखण्याचे आव्हान चित्रा यांच्यासमोर ठेवण्यात आले. त्यांनी पाचही दृश्यांमधील गाणी अचूक ओळखून गायली. यामध्ये सुहासिनी यांच्या चित्रपटांतील गाण्यांचाही समावेश होता. याशिवाय ध्वनिमुद्रणातील आव्हाने, अवघड गाणी आणि वाढत्या वयानुसार आपल्या आवाजाच्या मर्यादा ओळखण्याचे महत्त्व यावरही चर्चा झाली.iffi 2026 cinema goa chitra lata mangeshkar
कार्यक्रमातील सर्वाधिक लक्षवेधी क्षण ठरला तो 'सिंधू भैरवी' चित्रपटातील 'पाडारियेन' या गाण्याचा. चित्रा यांनी हे गाणे सादर करण्यास सुरुवात केली आणि सुहासिनी मणिरत्नम यांनीही त्यांच्यासोबत गाण्याच्या तालावर ओठांची हालचाल करत या क्षणात सहभाग घेतला. संगीत, मैत्री आणि आठवणी यांचा सुंदर संगम यावेळी अनुभवायला मिळाला.iffi 2026 cinema goa chitra lata mangeshkar
 




संबंधित मजकूर