
पणजी (विशेष प्रतिनिधी )- iffi 2026 cinema girish kulkarni baapya स्त्री -पुरुष ओळख, कौटुंबिक नातेसंबंध, व्यक्तिस्वातंत्र्य आणि सामाजिक स्वीकार अशा संवेदनशील विषयांवर भाष्य करणारा ‘बाप्या’ हा मराठी विनोदी-नाट्यपट सध्या गोव्यात सुरू असलेल्या ५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चर्चेचा विषय ठरला आहे. भारतीय पॅनोरमाच्या मुख्य प्रवाहातील चित्रपट विभागात या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. चित्रपट आणि इतर कलाप्रकार हे केवळ समकालीन समाजाचे प्रतिबिंब दाखवत नाहीत, तर सामाजिक प्रगतीला दिशाही देतात. ‘बाप्या’मधून आपल्या सांस्कृतिक मुळांपासून दूर न जाता बदलत्या काळानुसार परंपरांचा नव्याने अर्थ लावण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं प्रतिपादन यावेळी गिरीश कुळकर्णी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केले. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते समीर तेवारी यावेळी उपस्थितीत होते..
दिग्दर्शक समीर तेवारी यांनी सांगितले की, ‘बाप्या’ हा चित्रपट समाजाला उपदेश करण्यासाठी किंवा कोणतेही धडे देण्यासाठी बनवलेला नाही. एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या इच्छेनुसार जगायचे असते आणि आजूबाजूच्या माणसांनी त्याचा जसा आहे तसा स्वीकार करावा, ही साधी पण महत्त्वाची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. स्वीकार, समजूतदारपणा आणि नातेसंबंध यांची ही कथा आहे.iffi 2026 cinema girish kulkarni baapya
मराठी भाषेतच हा चित्रपट करण्यामागील भूमिकाही तेवारी यांनी स्पष्ट केली. एखाद्या विशिष्ट कलाकाराला केंद्रस्थानी ठेवून कथा लिहिण्याऐवजी प्रामाणिक आणि आशयपूर्ण पटकथेवर आधारित चित्रपट करण्याची त्यांची इच्छा होती असं त्यांनी सांगितलं..iffi 2026 cinema girish kulkarni baapya
अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनीही या विषयावर आपली भूमिका मांडली. प्रत्येक व्यक्तीला कोणताही पूर्वग्रह न ठेवता सन्मानाने वागवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. निसर्गातील विविध झाडे आणि वनस्पती आपण त्यांच्या वेगळेपणासह स्वीकारतो, मग माणसांच्या बाबतीतही हाच दृष्टिकोन का ठेवू नये, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.iffi 2026 cinema girish kulkarni baapya
भाषा, वेशभूषा आणि व्यक्तीची ओळख यांमधील विविधता स्वीकारणे ही भारताच्या एकतेतील विविधतेची खरी ताकद आहे. स्वीकार आणि प्रेम हीच या चित्रपटाची मध्यवर्ती भावना असल्याचेही त्यांनी नमूद केले.iffi 2026 cinema girish kulkarni baapya
इफ्फीसारखे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ देश-विदेशातील चित्रपट निर्माते आणि प्रेक्षकांना एकत्र आणते. विविध प्रकारच्या सिनेमांचा अनुभव घेण्याबरोबरच त्यावर अर्थपूर्ण चर्चा करण्याची संधी अशा महोत्सवांमुळे मिळते, असेही गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले.iffi 2026 cinema girish kulkarni baapya