_202611261231319675.jpg)
पणजी (विशेष प्रतिनिधी ) - iffi 2026 cinema Anil Ravipudiप्रेक्षकांना हसवणे ही वरकरणी सोपी गोष्ट वाटत असली, तरी प्रत्यक्षात ती अत्यंत आव्हानात्मक आणि गंभीर सर्जनशील प्रक्रिया आहे. विनोदी चित्रपट तयार करताना प्रेक्षकांना कोणता विनोद आवडेल, कोणत्या प्रसंगावर ते मनमुराद हसतील, याचा अंदाज बांधणे कठीण असते. त्यामुळे विनोदनिर्मिती हा देखील तितकाच गंभीर व्यवसाय आहे, असे मत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक अनिल रविपुडी यांनी व्यक्त केले.
गोव्यात सुरू असलेल्या ५७व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांच्या 'मना शंकर वर प्रसाद गारू' या तेलुगू चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी चित्रपटाचे निर्माते साहू गरपती, निर्मात्या के. सुष्मिता आणि अभिनेत्री कॅथरीन ट्रेसा उपस्थित होत्या.iffi 2026 cinema Anil Ravipudi
अनिल रविपुडी दिग्दर्शित हा १६४ मिनिटांचा चित्रपट इफ्फीमधील भारतीय पॅनोरमाच्या मुख्य प्रवाहातील चित्रपट विभागासाठी निवडण्यात आलेल्या पाच चित्रपटांपैकी एक आहे.iffi 2026 cinema Anil Ravipudi
चित्रपटाच्या लेखनप्रक्रियेविषयी बोलताना रविपुडी म्हणाले की, विनोदी प्रसंग लिहिताना केवळ हसवण्याचा विचार करून चालत नाही. त्यासोबत कौटुंबिक भावना आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांचाही विचार करावा लागतो. विशेषतः चिरंजीवी यांच्यासारख्या लोकप्रिय सुपरस्टारसोबत काम करताना प्रेक्षकांच्या अपेक्षा मोठ्या असतात. त्यामुळे कथानक आणि विनोद यांचा योग्य समतोल साधणे हे मोठे आव्हान असते. या प्रक्रियेत आपल्या लेखन टीमचे मोठे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले.
iffi 2026 cinema Anil Ravipudi
चिरंजीवी यांचे चित्रपट पाहत आपण मोठे झालो आहोत. त्यांच्या विविध भूमिकांचा अभ्यास आणि त्यांची अभिनयशैली लक्षात घेऊन त्यांच्यासाठी साधी, कौटुंबिक भावनांना स्पर्श करणारी कथा तयार केल्याचे रविपुडी यांनी नमूद केले.iffi 2026 cinema Anil Ravipudi
अभिनेत्री कॅथरीन ट्रेसा यांनीही यावेळी आपले अनुभव मांडले. चिरंजीवी यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्यासोबत काम करणे हा शिकण्याचा महत्त्वाचा अनुभव होता, असे त्या म्हणाल्या. गंभीर भूमिकांमधून हलक्याफुलक्या भूमिकांकडे वळताना कलाकाराने आपली अभिनयक्षमता आणि दिग्दर्शकाची दृष्टी समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.iffi 2026 cinema Anil Ravipudi
चित्रपट महोत्सवांमध्ये केवळ कलात्मक चित्रपटांनाच नव्हे, तर मोठ्या प्रेक्षकवर्गाशी नाते जोडणाऱ्या व्यावसायिक चित्रपटांनाही स्थान मिळणे गरजेचे आहे, असे मत रविपुडी यांनी व्यक्त केले.iffi 2026 cinema Anil Ravipudi