'इंडियन कॉन्स्टिट्यूशन फेस्टिव्हल'चा २६ नोव्हेंबरला भव्य शुभारंभ!

संविधानाचा विचार घराघरांत पोहोचवणारा दोन महिन्यांचा जागतिक महोत्सव

    25-Nov-2026   
 

Indian Constitution Festival 2026-27 
 
मुंबई (Indian Constitution Festival 2026-27): भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी 'इंडियन कॉन्स्टिट्यूशन फेस्टिव्हल (ICF 2026-27)' या जागतिक स्तरावरील वैशिष्ट्यपूर्ण महोत्सवाच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत अटल स्मृती केंद्र, शिपोली, बोरिवली (पश्चिम) येथे या महोत्सवाचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
 
या उद्घाटन समारंभाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार प्रमुख पाहुणे म्हणून, तर सुप्रसिद्ध कवयित्री व ज्येष्ठ साहित्यिका प्रा. मल्लिका अमर शेख ढसाळ या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांचे विशेष मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभणार आहे.  (Indian Constitution Festival 2026-27)
 
२६ नोव्हेंबर ते २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) असे सलग दोन महिने चालणाऱ्या या महोत्सवात निबंधलेखन, वक्तृत्व, कविता, ललित कला आणि रंगकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. गतवर्षी मुंबई विद्यापीठ आणि 'बार्टी'च्या (BARTI) सहकार्याने या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. संविधान केवळ पुस्तकापुरते न राहता ते प्रत्यक्ष जगण्यात उतरावे, या उद्देशाने आयोजक विवेकानंद इंगळे आणि कोमल कोळी यांनी हा उपक्रम हाती घेतला असून, नागरिक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Indian Constitution Festival 2026-27)
 
 




योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
संबंधित मजकूर