मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथे सुरू असलेल्या मुंबई पुस्तक महोत्सवाला (Mumbai Book Festival) विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पहिल्या दोन तासांत तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांनी महोत्सवाला भेट दिली. विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने महोत्सव परिसरात सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळाली. दि. २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील गेट क्रमांक २ येथे हा महोत्सव होणार आहे.
विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पुस्तकांची ओळख व्हावी, वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना साहित्यविश्वाशी जोडता यावे, या उद्देशाने महोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कथाकथन, चित्रकला, लेखन, वाचन, प्रश्नमंजुषा आणि विविध सर्जनशील स्पर्धांचा यात समावेश आहे. पुस्तकांच्या विविध दालनांसह साहित्यिक कार्यक्रम, चर्चासत्रे आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई पुस्तक महोत्सवाला (Mumbai Book Festival) विद्यार्थी आणि वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Aap aa rahe ho na? 👀📚
Come, be a part of Mumbai’s grand celebration of books!
📅 24–29 November 2026
⏰ 10 AM – 8 PM
📍 University of Mumbai, Kalina Campus, Santacruz
🎟️ FREE ENTRY | OPEN TO ALL
#MumbaiBookFestival2026 #BookLovers #MumbaiEvents #ReadingCulture #LiteraryFestival
मुंबई पुस्तक महोत्सवात ६०० हून अधिक पुस्तकांचे स्टॉल, २०० पेक्षा अधिक साहित्यिक सत्रे, २० हून अधिक बालकांसाठीचे उपक्रम आणि ९५ हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘लेखक मंच–१’. या मंचावर विविध विषयांवरील साहित्यिक चर्चा, विचारमंथन आणि लेखकांशी संवाद आयोजित करण्यात येणार आहे.मराठी साहित्य, समकालीन लेखन, नाटक, इतिहास, पत्रकारिता, राजकारण, शिक्षण आणि सामाजिक प्रश्न अशा विविध विषयांचा या सत्रांमध्ये समावेश आहे. नामवंत लेखक, साहित्यिक आणि विचारवंत या चर्चांमध्ये सहभागी होणार आहेत.
मराठी लेखक मंचावर ५० सत्रे
मराठी साहित्यप्रेमींसाठी ‘लेखक मंच–२ (मराठी मंच)’ हे विशेष व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या मंचावर एकूण ५० सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. मराठी साहित्य, भाषा, संस्कृती आणि समकालीन सामाजिक विषयांवर या मंचाच्या माध्यमातून चर्चा होणार आहे. साहित्यिक चर्चांसोबतच महोत्सवात संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, गायक अवधूत गुप्ते आणि अन्य कलाकारांचे कार्यक्रम हे महोत्सवाचे आकर्षण असणार आहेत.