मुंबई (Jio Happy New Year 2.0): नववर्षाच्या स्वागतासाठी जिओने ग्राहकांना डेटा वापरावर कोणतीही मर्यादा नसलेली खास भेट दिली आहे. कंपनीने ‘हॅपी न्यू इयर २.०’ अंतर्गत अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा देणारे नवे रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. यामध्ये २८ दिवसांसाठी अनलिमिटेड डेटा देणारा ३९९रू. चा नवा फ्लॅगशिप प्लॅन हे प्रमुख आकर्षण आहे. या प्लॅनमध्ये मोफत व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. व्हिडिओ स्ट्रीमिंग, ऑनलाइन गेमिंग किंवा सोशल मीडिया वापरताना डेटा संपण्याची चिंता ग्राहकांना राहणार नाही. जिओने आपल्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त सुरू केलेल्या उत्सवाचा विस्तार करत ही ऑफर सादर केली आहे.
वारंवार रिचार्ज करण्याची गरज टाळू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी जिओने ३,९९९ रू. चा वार्षिक प्लॅन आणला आहे. एकदाच रिचार्ज केल्यावर तब्बल ३६५ दिवस अनलिमिटेड 4G-5G डेटा वापरता येणार आहे. या प्लॅनमध्येही मोफत व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतील. दोन्ही प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे 4G आणि 5G या दोन्ही नेटवर्कवर अनलिमिटेड डेटा वापरण्याची सुविधा. यासोबतच मनोरंजन, डिझाइन आणि क्लाउड स्टोरेजसारख्या डिजिटल सुविधांचाही लाभ मिळणार आहे. (Jio Happy New Year 2.0)
इतर जिओ प्लॅन वापरणाऱ्या ग्राहकांसाठीही कंपनीने खास डेटा ऑफर आणल्या आहेत. काही काळासाठी अधिक डेटाची गरज असणारे ग्राहक १५रू. किंवा २५रू. चे अनलिमिटेड 5G डेटा ॲड-ऑन घेऊ शकतात. १५रू. च्या पॅकमध्ये एका दिवसासाठी, तर २५रू. च्या पॅकमध्ये दोन दिवसांसाठी अनलिमिटेड 5G डेटा मिळेल. या ॲड-ऑनमध्ये डेटा डाउनलोड किंवा वापरावर कोणतीही मर्यादा नसेल आणि इंटरनेटचा वेगही कमी केला जाणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. (Jio Happy New Year 2.0)
रात्री उशिरापर्यंत गेमिंग, चित्रपट-मालिका पाहणे किंवा काम करणाऱ्या ग्राहकांसाठी ५०रू. चा नाइट डेटा पॅकही सादर करण्यात आला आहे. या पॅकमध्ये २८ दिवसांसाठी दररोज मध्यरात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत अनलिमिटेड 4G-5G डेटा वापरता येईल. रात्री वापरलेला डेटा मुख्य प्लॅनमधील डेटा बॅलन्समधून वजा होणार नाही. त्यामुळे दिवसभराचा डेटा शिल्लक ठेवून ग्राहकांना रात्री इंटरनेटचा मुक्तपणे वापर करता येणार आहे. (Jio Happy New Year 2.0)
डिजिटल सुविधांमध्ये ३९९रू. च्या फ्लॅगशिप प्लॅनसोबत १२ महिन्यांचे कॅनव्हा प्रो सबस्क्रिप्शन मिळणार आहे. या सबस्क्रिप्शनची नमूद किंमत ४,०००रू. आहे. याशिवाय जिओहॉटस्टार मोबाईल + हॉलीवूड, जिओटीव्हीच्या माध्यमातून फॅनकोड, जिओगेम्स मोबाईल सबस्क्रिप्शन आणि जिओएआयक्लाउडवर ५० जीबी मोफत स्टोरेज मिळेल. जस्टडायल लाइट, हायपरलोकल कूपन्स आणि डिजिटल डायरीसारख्या सुविधांचाही यात समावेश आहे. तर ३,९९९ रू. च्या वार्षिक प्लॅनमध्ये १२ महिन्यांचे कॅनव्हा प्रो लाइट, जिओहॉटस्टार, फॅनकोड आणि ५० जीबी क्लाउड स्टोरेज यांसारखे फायदे मिळतील. (Jio Happy New Year 2.0)
३९९रू. आणि ३,९९९ रू. चे नवे प्लॅन २४ नोव्हेंबरपासून मायजिओ ॲप, जिओची वेबसाइट, देशभरातील जिओ स्टोअर्स आणि रिटेलर्सकडे रिचार्जसाठी उपलब्ध होतील. २५रू. चा 5G डेटा ॲड-ऑनही याच दिवशी उपलब्ध होईल, तर १५रू. चा पॅक आधीपासूनच उपलब्ध आहे. ५०रू. चा नाइट डेटा पॅक २६ नोव्हेंबरपासून ग्राहकांना घेता येईल. (Jio Happy New Year 2.0)