हिजाबविना गाणे गायल्याबद्दल इराणी गायिकेला ७४ फटक्यांची शिक्षा

गायिका परस्तू अहमदीसह चार सहकाऱ्यांनाही शिक्षा; दोन वर्षे संगीत क्षेत्रात काम करण्यास आणि देशाबाहेर जाण्यास बंदी

    24-Nov-2026

Iranian Singer Parastoo Ahmadi
 
तेहरान, (Iranian Singer Parastoo Ahmadi) : इराणमधील गायिका परस्तू अहमदी आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांना प्रत्येकी ७४ फटके मारण्याची शिक्षा सोमवारी (२३ नोव्हेंबर) अंमलात आणण्यात आली. हिजाब न परिधान करता सार्वजनिक कार्यक्रमात गाणे गायल्याच्या आणि अश्लील आशयाचा मजकूर प्रसारित केल्याच्या आरोपाखाली जून २०२६ मध्ये कुम शहरातील न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली होती. बचाव पक्षाचे वकील मुस्तफा नीली यांनी याबाबत माहिती दिल्याचे रॉयटर्सने वृत्त दिले आहे.
 
या प्रकरणाची सुरुवात डिसेंबर २०२४ मध्ये झाली होती. त्यावेळी २९ वर्षीय परस्तू अहमदी यांनी यूट्यूबवर २७ मिनिटांचा संगीत कार्यक्रम प्रसारित केला होता. यात त्यांनी हिजाब न परिधान करता बिनबाह्यांचा पोशाख घालून चार पुरुष संगीतकारांसोबत गायन केले होते. या कार्यक्रमाला प्रत्यक्ष प्रेक्षक उपस्थित नव्हते. त्यांनी 'अज खूने जवानाने वतन' (मातृभूमीच्या तरुणांच्या रक्तातून) हे प्रसिद्ध देशभक्तिपर गीतही गायले होते.(Iranian Singer Parastoo Ahmadi)
 
या कार्यक्रमानंतर इराणी प्रशासनाने त्यांच्याविरोधात कारवाई केली. न्यायालयाने अहमदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ७४ फटक्यांसह दोन वर्षे संगीत व कलाक्षेत्रात काम करण्यास आणि देशाबाहेर जाण्यास बंदी घातली होती. सप्टेंबरमध्ये अपील न्यायालयानेही शिक्षा कायम ठेवली.
 
दरम्यान, या कारवाईमुळे इराणमधील महिलांचे स्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि धार्मिक नियमांच्या अंमलबजावणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.(Iranian Singer Parastoo Ahmadi)
 




संबंधित मजकूर