हनुमान चालीसा पठण केल्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही : अजिंक्य देव

    24-Nov-2026

MahaMTB Entertainment


मुंबई (Ajinkya Deo Hanuman Chalisa Reading) :
“माझ्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या, त्यानंतर मी हनुमान चालीसा पठण करू लागलो. त्यानंतर माझ्या आयुष्यात ‘रामायण’ हा सिनेमा आला. रामायण हे केवळ महाकाव्य नसून ती एक प्रचिती आहे. तुम्ही जेव्हा संपूर्णपणे स्वतः देवाला शरण जाता तेव्हा तुम्हाला अपेक्षित गोष्टी घडतात. रामायण सिनेमा करणे, त्यात विश्वमित्र ऋषींची भूमिका साकारणे हे विधीलिखीतच आहे, असेच मी म्हणतो.”, असे उद्गार अभिनेता अजिंक्य देव यांनी काढले. ‘महा-एमटीबी’च्या ‘अनफिल्टर्ड गप्पा’ या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
हनुमान चालीसा पठण सुरू केल्यानंतर माझ्या आयुष्यात बदल जाणवू लागले. मी आज घराबाहेर पडताना हनुमान चालीसा म्हटल्याशिवाय बाहेर जात नाही, असे ते म्हणाले. “मी प्रचंड हनुमान भक्त आहे. हनुमान चालीसा म्हटल्याशिवाय मी काही घराबाहेर पडत नाही. जिथे वेळ असेल तिथे हनुमान चालीसा पठण सुरू असते. मला जिथे जिथे वेळ मिळेल तिथे मी हनुमान चालीसा पठण करत असतो. मला हनुमान चालीसा पठणही आवडते. माझ्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या त्यानंतर मी हनुमान भक्तीकडे वळलो”, असे ते म्हणाले.
रामायण सिनेमात साकारली विश्वमित्र ऋषींची भूमिका

‘प्रहार’ सिनेमात राकेश मारिया यांच्यापासून प्रेरित झालेल्या बिपीन नारिया यांची भूमिका अजिंक्य देव यांनी साकारली. तसेच रामायण सिनेमात त्यांनी विश्वमित्र ऋषींची भूमिका साकारली आहे. त्यापूर्वी त्यांना राजा दशरथांची भूमिकेबद्दलही विचारणा झाली होती. ‘महा-एमटीबी अनफिल्डर्ड’ गप्पांमध्ये त्यांनी याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सोबत दिलेल्या युट्यूब लिंकवर क्लिक करा!







संबंधित मजकूर