_202611231606131382.jpg)
मुंबई ( विशेष प्रतिनिधी ) - Miranda warning sachin dhotre Jahnavi Killekarचित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि सामाजिक परिवर्तनाला हातभार लावण्याचे प्रभावी साधनही आहे. याच विचाराला कृतीची जोड देत ‘मिरांडा वॉर्निंग’ या आगामी मराठी चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक सचिन धोत्रे यांनी एक महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. या चित्रपटातून मिळणारा संपूर्ण नफा राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यामुळे प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट आपल्या सामाजिक बांधिलकीमुळे चर्चेत आला आहे. येत्या २७ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दुष्काळाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. पाण्याची टंचाई, शेतीसमोरील आव्हाने आणि आर्थिक अडचणी अशा अनेक समस्यांमुळे ग्रामीण जनजीवन प्रभावित होत असताना या परिस्थितीकडे केवळ प्रेक्षक म्हणून न पाहता समाजाचा एक घटक म्हणून आपली जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे. याच भावनेतून सचिन धोत्रे यांनी आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे.Miranda warning sachin dhotre Jahnavi Killekar
चित्रपटाच्या निर्मितीमागे केवळ व्यावसायिक यशाचा विचार न करता सामाजिक जाणीवही असायला हवी, असे धोत्रे यांचे मत आहे. कलेच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी सकारात्मक करता यावे, या उद्देशाने त्यांनी चित्रपटाच्या नफ्याचा विनियोग दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी करण्याचे ठरवले आहे. चित्रपटसृष्टीत एखाद्या कलाकृतीच्या यशाचा विचार प्रामुख्याने बॉक्स ऑफिसवरील कमाईच्या संदर्भात केला जातो. मात्र, त्या यशातून समाजातील गरजू घटकांना मदत मिळू शकते, हा विचार त्यांनी आपल्या निर्णयातून अधोरेखित केला आहे.Miranda warning sachin dhotre Jahnavi Killekar
सचिन धोत्रे यांच्या या उपक्रमाचे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय विठोबा भरणे यांनी विशेष कौतुक केले आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याने समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पुढे येऊन मदतीसाठी हातभार लावण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील मंडळींनीही अशा सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
Miranda warning sachin dhotre Jahnavi Killekar
सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांत दुष्काळाचे सावट असून शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक संकटात आहेत. समाजाप्रती असलेली कृतज्ञता आणि बांधिलकी जपण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता, कलेच्या माध्यमातून थेट सामाजिक प्रश्नांना हातभार लावण्यासाठी हा निर्णय घेतला घेतल्याचे सचिन धोत्रे यांनी सांगितले.Miranda warning sachin dhotre Jahnavi Killekar
सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मूव्हीज यांच्या माध्यमातून ‘मिरांडा वॉर्निंग’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन धोत्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. चित्रपटात आदिनाथ कोठारे, जान्हवी किल्लेकर, पायल जाधव, सुरेश विश्वकर्मा, वैभव चव्हाण, एकनाथ गीते, त्रिशा कमलाकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.Miranda warning sachin dhotre Jahnavi Killekar