संयुक्त राष्ट्र आमसभेच्या तिसर्या समितीअंतर्गत दि. १७ नोव्हेंबर रोजी फ्रान्स आणि नेदरलॅण्ड्स यांनी महिला आणि मुलींवरचा हिंसाचार रोखणे, हा मसुदा मांडला. १९५ देशांपैकी १७५ देशांनी या मसुद्याचे समर्थन केले, तर सहा देशांनी तटस्थ भूमिका घेतली. या शोषित, वंचित आणि पीडित लोकांना हक्क मिळावेत, अधिकार मिळावेत, याविरोधात मतदान प्रक्रियेत तटस्थ भूमिका घेणार्या या देशांमध्ये पाच अविकसित देशांसोबत अमेरिका आणि रशिया हे दोन देशही आहेत. का? कशासाठी? जगभरात न्याय, स्वातंत्र्य आणि मानवी मूल्यांसाठी साथ देतो, असे सांगणार्या या देशांनी या मसुद्याला नेमका विरोध का केला? तर याचे उत्तर आहे, कट्टरता आणि धर्मांधता!
महिलांना गर्भपाताचा हक्क? नव्हे, हे योग्य नाही!’ असे म्हणत संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या समितीने ठराव केलेल्या मसुद्याबाबत अमेरिकेने आणि सोबत रशिया, अर्जेंटिना, बेलारूस, बुर्किना फासो आणि कॅमेरून या देशांनीही तटस्थ भूमिका घेतली, तर सोमालिया या देशाने विरोधातच मतदान केले. याचे आणखी एक कारण होते, ते म्हणजे या मसुद्यामधील लिंगसमानता. मसुद्यामध्ये केवळ स्त्री आणि पुरुष या दोघांचाच अंतर्भाव असावा, तृतीयपंथीयांना समानेचा हक्क नको, असेही यांचे म्हणणे. तरीही, फ्रान्स आणि नेदरलॅण्ड्स यांनी पुढाकार घेऊन मांडलेल्या या मसुद्याच्या समर्थनार्थ १७५ देशांनी मतदान केले. हा मसुदा मांडणारी समिती कोण आहे? तर, संयुक्त राष्ट्र आमसभेची तिसरी समिती. ही आमसभेतील सहा मुख्य समित्यांपैकी एक असून, तिला अधिकृतपणे ‘सामाजिक, मानवतावादी आणि सांस्कृतिक समिती’ असे म्हटले जाते. जगभरातील मानवी हक्क आणि सामाजिक न्यायाशी संबंधित धोरणे ठरवण्याचे काम ही समिती करते. या समितीने मानवी मूल्यांच्या धोरणानुसार महिलांच्या न्याय-हक्कासाठी मसुदा तयार केला. मंजुरी मिळण्यासाठी मतदान घेतले. मसुद्यातील मुद्दे बघितले; तर चटकन जाणवते की, हे मुद्दे महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी अत्यंत योग्य आहेत. जगभरात कट्टरपंथी देशांमध्ये किंवा अतिमुक्ततावादी देशांमध्येही मुली-महिलांसोबत जे गुन्हे घडतात, त्याविरोधात हे मुद्दे अत्यंत प्रभावी आहेत. मात्र, तरीही या मसुद्याला विरोध करत अमेरिका-रशियासारख्या देशांनी तटस्थतेची भूमिका का घ्यावी? सोमालियासारख्या अंतर्गत गृहयुद्धाने होरपळलेल्या कंगाल देशानेही थेट विरोधाची भूमिका का घ्यावी? तर, या प्रश्नाचे उत्तर आहे धर्मांधता, कट्टरता आणि कालबाह्य रूढींपुढे या देशांनी मानलेली हार!
तर, महिलांना गर्भपाताचा हक्क किंवा लिंगसमानतेच्या संदर्भात तृतीयपंथीयांचा समावेश, याला अमेरिका-रशियासह इतर पाच राष्ट्रांनी विरोध केला. आधीच सांगितल्याप्रमाणे याचे कारण आहे धर्मांधता. ‘कॅथोलिक’ चर्च आणि बहुतांश पारंपरिक ‘प्रोटेस्टंट’ चर्च या ‘बायबल’च्या वचनांच्या आधारे मानतात की, गर्भधारणेच्या पहिल्या क्षणापासूनच बाळाला आत्मा आणि जगण्याचा हक्क मिळतो. त्यामुळे ते गर्भपाताला विरोध करतात. काही वचनांचा आधार घेऊन ख्रिश्चन मानतात की, देवाने गर्भात जीव टाकला. त्यामुळे गर्भपात करणे हे पाप आहे. त्यामुळेच आज २१व्या शतकामध्येही पारंपरिक विचारांचा ख्रिश्चन समाज मानतो की, गर्भपात करणे म्हणजे पाप आणि येशू-विचारांच्या विरोधात जाणे होय. कमाल आहे, शरीर महिलेचे, त्या शरीरात तयार होणारा गर्भ महिलेचा, मात्र तिला किंवा तिच्या जोडीदाराला त्या गर्भाबद्दल निर्णय घेण्याचा अधिकारच नाही. परिस्थिती कशीही असली, तरी मुली-महिलांनी गर्भपात करणे म्हणजे अक्षम्य अपराध! ख्रिश्चन धर्मात गर्भपात करण्यास पाप मानले जाते, म्हणून जगातील २१ देशांमध्ये गर्भपात करण्यास बंदी असून, अमेरिकेत १३ राज्यांमध्ये गर्भपातास बंदी आहे. मात्र, या बंदीमुळे त्या देशातील महिलांचे प्रजनन आरोग्य अगदी रसातळाला गेले. हार्मोन्समधील बदल, नको असलेला गर्भ काढून टाकण्यासाठी चोरून औषध घेणे, पारंपरिक उपाय करणे, यामुळे महिलांच्या आरोग्याचे नुकसान होत आहे. बलात्कार किंवा इतर कारणाने नको असलेले मूलही महिलांना जन्माला घालावे लागते किंवा हे टाळण्यासाठी चुकीची पावले उचलून हकनाक मृत्यूच्या दाढेत जावे लागत आहे.
याबाबतच्या काही सत्यघटना पाहू. जॉर्जिया मधील ४१ वर्षीय कॅण्डी हिला गंभीर आजार (ल्युपस, मधुमेह, उच्च रक्तदाब) होते. गर्भधारणा झाली तर तिच्या जीवावर बेतू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले. राज्यात गर्भपातास बंदी असल्याने तिने घरीच गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या. पण, त्रास वाढला. तरीही, ती रुग्णालयात गेली नाही. कारण, कॅण्डीला भीती वाटली की, देशात गर्भपात करण्यास कायदेशीर बंदी आहे. जर बाहेर कुणाला कळले की, गर्भपातासाठी गोळ्या घेतल्या; तर कठोर कारवाई होईल. शेवटी उपचाराविना तडफडत घरीच तिचा मृत्यू झाला.
दुसरी घटना टेक्सासची. गर्भवती असलेल्या २८ वर्षीय जोसेली हिला रक्तस्राव होत होता. मात्र, डॉटरांनी कायद्याच्या भीतीने गर्भ बाहेर काढण्यास तब्बल ४० तास उशीर केला. त्यामुळे गंभीर संसर्ग होऊन जोसेलीचा मृत्यू झाला. अशा अनेक घटनांमध्ये महिलांचा बळी जात आहे. कारण, या देशांमध्ये गर्भपातास बंदी आहे. ब्राझील देशाची अशीच एक अत्यंत दुर्दैवी घटना. ११ वर्षांची अनाथ बालिका दृष्टिहीन आजीसोबत राहात होती. मात्र, काही महिन्यांतच आजीच्या लक्षात आले की, नात गरोदर आहे. असे कसे घडले. नात घराबाहेर शाळेव्यतिरिक्त जातही नसे. फक्त तिचा वयस्कर काका कधीकधी घरी यायचा. आजीला कळले, काकाने या अबोध बालिकेवर अत्याचार केले आहेत. तिने पोलीस तक्रार केली. काका तुरुंगात गेला, तर बालिकेला संसर्गामुळे रक्तस्राव होऊ लागला. तिचा जीव वाचवायचा तर गर्भपात करावा लागणार. आजी बालिकेला घेऊन रुग्णालयात गेली. देशाच्या कायद्यानुसार गर्भपात करणे गुन्हाच! आजी खूप रडली, पाया पडली की, ही बालिका आहे, तिचीच काळजी मी कशीबशी घेते. आणखीन तिच्यावर मातृत्व कसे लादायचे. शेवटी दया येऊन डॉटर तयार झाले. मात्र, ही गोष्ट वार्यासारखी शहरात पसरली. धर्माविरोधात सैतानी कृत्य होत आहे, म्हणून शेकडो ख्रिश्चन लोकांनी रूग्णालयाला वेढा घातला. हॉस्पिटल जाळण्याच्या धमया दिल्या. गर्भपाताचे समर्थन करणार्या सैतान आजीला बाहेर काढा, तिला मारा, असे ते म्हणू लागले. ही घटना पुन्हा वार्याच्या वेगाने शहरात पसरली आणि अनेक सामाजिक संघटना, कार्यकर्ते रुग्णालयाच्या परिसरात जमले. पण, तोपर्यंत मुलीला भरपूर त्रास झाला होता. ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला, तिचा जीव धोयात आला, तरी तिने बाळाला जन्म द्यायचाच, ही अशी संस्कृती?
अर्जेंटिनामध्येही अशीच घटना घडली होती. बलात्कारातून, हिंसेतून जबरदस्तीने झालेले अवांछित मातृत्व लादण्याला मान्यता देताना आणि तृतीयपंथीयांना समानतेचे जगणे नाकारताना हे देश कोणती मानवी मूल्ये जोपासत आहेत?
जगभरातल्या मुस्लीम देशांमध्ये हिजाब, बहुविवाह, ‘मूल अल्लाची देण आहे’ ही संकल्पना किंवा ‘हलाला’ आणि ‘तलाक’ यांमुळे बहुसंख्य महिलांचे जगणे दुःखद आहे; तर लग्नाच्या जोड्या स्वर्गात बनतात, म्हणून ती तोडून घटस्फोट घेणे पाप असे मानत, परंपरेनुसार घटस्फोटाला मान्यता नसणे आणि स्वतःच्या शरीरात गर्भ असावा की नसावा, याबाबत शून्य हक्क, लैंगिक हिंसा आणि शोषण, यामुळे अनेक पाश्चात्त्य देशांमध्ये मुली-महिलांचे जगणे भयंकरच झाले आहे. मात्र, तरीही अनेक भारतीयांना वाटते की, पाश्चात्त्य देशांत मुक्त विचारसरणी आहे. काय ते मुक्त जगणे वा-वा! तसेच व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल तसे राहावे, बोलावे, वागावे, अशी संज्ञा आहे म्हणे. हे व्यक्तिस्वातंत्र्य हवे म्हणून अनेक भारतीयांना पाश्चात्त्य देशांत जायचे असते. पण, या व्यक्तिस्वातंत्र्याआडचे हे धर्मपाखंडी नियम पाळताना तिथल्या महिलांची आणि कुटुंबांची जी दमछाक होते ती दमछाक? तर या पार्श्वभूमीवर अमेरिका, रशिया आणि इतर पाच देशांनी महिलांच्या गर्भपाताच्या हक्कासाठी मतदान न करता तटस्थ राहणे, हे अत्यंत दुःखद आहे. महिला भारताची असो की अमेरिकेची, मातृत्व आणि त्याअनुषंगाने येणार्या जबाबदार्या या समानच आहेत. तसेच तृतीयपंथीय भारताचे असू देत की सोमालियाचे, ती माणसेच आहेत. त्यांनाही मन आहे, भावना आहेत. त्यांना किमान माणूस म्हणून जगण्याची संधीही नाकारणारे हे देश! संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या तिसर्या समितीच्या मानवी हक्कावर आधारित मसुद्यामुळे या देशांचे चेहरे जगासमोर पुन्हा उघड झाले आहेत. युद्ध, हिसांचार, मानवी तस्करी, बेकारी, गरिबी, कुपोषण याभोवती जगाचे प्रश्न फिरत आहेत. याचबरोबर महिला आणि तृतीयपंथीयांसाठी सुरक्षित आरोग्य, माणूस म्हणून जगण्याचे अधिकार देणार्या संकल्पनेवर जग कधी एकवटणार?
९५९४९६९६३८