मुंबई (Mumbai Book Festival 2026): आजच्या युगात मोठ्या प्रमाणात युवा वर्गाचा स्क्रीन टाईम वाढतो आहे. आपल्या पाल्यांना मोबाईल स्क्रीनपासून कसे दूर ठेवता येईल हे पालकांपुढे मोठे आव्हान आहे. त्यामुळे स्क्रीनला पर्याय म्हणून मुंबईत पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. स्क्रीनच्या बाहेर पडून पुस्तकांमध्ये रमा अशी एक पुस्तक वाचन संस्कृती मुंबई शहरात विकसित करण्यात आली असून या नव्या अध्यायात मुंबईकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई पुस्तक महोत्सवाचे आयोजक आ. अमीत साटम यांनी केले.
शनिवारी, मुंबई विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुंबई पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे संचालक युवराज मलिक आणि मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. अजय भामरे उपस्थित होते. (Mumbai Book Festival 2026)
आ. अमीत साटम म्हणाले की, "मुंबई शहरात आजपर्यंत आपण फूड फेस्ट, सांस्कृतिक महोत्सव, दिवाळी महोत्सव, बॉलीवूड फेस्टिवल बघितला पण मुंबईत मेगा पुस्तक महोत्सव कधीच आयोजित केले गेले नव्हते. मुंबई शहरातील पहिला मेगा पुस्तक महोत्सव दि. २४ ते २९ नोव्हेंबरदरम्यान नॅशनल बुक ट्रस्टतर्फे मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आयोजित केला आहे. या पहिल्याच पुस्तक महोत्सवाला विविध स्तरांतून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे." (Mumbai Book Festival 2026)
"यात ६०० हून अधिक स्टॉल्स, ३०० हून अधिक प्रकाशक, १०० हून अधिक लेखक, २०० हून अधिक वक्ते, ६० हून अधिक साहित्यिक सत्रे आणि दर दिवशी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर गायक अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, कैलाश खेर यांची लाईव्ह मैफिल रंगणार आहे. तसेच २८ तारखेला सायंकाळी मराठी भाषेचा २ हजार वर्षांचा इतिहास सांगणारा मराठी संगीत रंगभूमी आणि २९ तारखेला भजन क्लबिंग कार्यक्रम आयोजित केला आहे. समाजातील विविध स्तरांतील लेखक आणि नामवंत वक्ते या महोत्सवात सहभागी होणार आहेत," असेही त्यांनी सांगितले. (Mumbai Book Festival 2026)
रेल्वे स्थानकापासून विशेष बसेसची सुविधा
"कार्यक्रम स्थळाच्या जवळपासची मेट्रो स्थानके आणि रेल्वे स्थानकांहून पुस्तक महोत्सवात लोकांना घेऊन येण्यासाठी मोफत अतिरिक्त बेस्ट बसेसची सुविधा करण्यात आली आहे. विशेषत: जेन नेक्स्ट युवा वर्गात या पुस्तक महोत्सवाविषयी उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अनेकजण यात आपले स्वारस्य दाखवत आहे. हा मुंबईकरांचा सामुदायिक कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम कुठल्याही एका सरकारने किंवा संस्थेने आयोजित केलेला नसून हा एक सामुदायिक कार्यक्रम आहे. मुंबई शहरात मुंबईकरांतर्फे मुंबईकरांसाठी आयोजित केलेला एक आगळावेगळा हा पुस्तक महोत्सव आहे," असेही त्यांनी सांगितले. (Mumbai Book Festival 2026)
रक्तदान मोहिम
"मुंबई शहरात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे या महोत्सवात रक्तदान मोहिमही आयोजित करण्यात आली आहे. जेणेकरून या पुस्तक महोत्सवात आलेल्या तमाम लोकांनी आधी रक्तदान करावे आणि नंतर या पुस्तक महोत्सवाचा आनंद घ्यावा," असे आवाहनही आ. अमीत साटम यांनी केले. (Mumbai Book Festival 2026)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....