स्वीडनची कॅन्डेला पी 12 बोट मुंबईच्या समुद्रावर धावणार ! कॅन्डेला पी 12ची मुंबईत यशस्वी चाचणी

मुंबईत लवकरच ‘देवयान’चे लोकार्पण! भारतातील पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल प्रवासी नौका


Candela P-12 Electric Hydrofoil Boat Mumbai
 
मुंबई, (Candela P-12 Electric Hydrofoil Boat Mumbai) :भारतातील पहिल्या पूर्णपणे इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल प्रवासी नौकेची महाराष्ट्रात यशस्वीरीत्या चाचणी घेण्यात आली आहे. स्वीडनमधून आयात करण्यात आलेल्या या आधुनिक ‘कँडेला पी-१२’ या नौकेच्या चाचण्यांमुळे आता देशातील शाश्वत जलवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली. 'महाराष्ट्रातून भारताच्या सागरी नवोन्मेषाच्या नव्या पर्वाची सुरुवात!', असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही आनंदाची बातमी जाहीर केली.
 
महाराष्ट्र शासन, रूरल एन्हान्सर्स ग्रुप आणि साधव शिपयार्ड्स लिमिटेड यांच्या संयुक्त पुढाकारातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाचीही या उपक्रमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दरम्यान, मे, 2026 रोजी ही बोट सुरक्षितरीत्या जेएनपीटी बंदरात उतरविण्यात आली. सर्व कायदेशीर आणि तांत्रिक बाबी पूर्ण करत या बोटीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.(Candela P-12 Electric Hydrofoil Boat Mumbai)
 
हायड्रोफॉइल तंत्रज्ञानामुळे वेग आणि कार्यक्षमता
 
कँडेला पी-१२ ही अत्याधुनिक इलेक्ट्रिक प्रवासी नौका असून, तिच्यामध्ये हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. नौकेच्या पाण्याखालील विशेष पंखांमुळे वेग वाढल्यानंतर नौकेचा बहुतांश भाग पाण्याच्या पृष्ठभागावर उचलला जातो. त्यामुळे पाण्याचा प्रतिरोध कमी होऊन नौकेची कार्यक्षमता वाढते आणि कमी ऊर्जा वापरून अधिक वेगाने प्रवास करणे शक्य होते. ही नौका पूर्णपणे विद्युत ऊर्जेवर चालत असल्याने प्रवासादरम्यान थेट उत्सर्जन होत नाही. पारंपरिक डिझेल नौकांच्या तुलनेत आवाजही कमी असल्यामुळे पर्यावरणपूरक आणि शांत जलवाहतुकीसाठी हा पर्याय महत्त्वाचा ठरू शकतो.(Candela P-12 Electric Hydrofoil Boat Mumbai)
 
कशी असेल बोट ?
 
कॅन्डेला ही फेरी १२ मीटर लांब आणि ४.५ मीटर रुंद आहे. ती एकावेळी सुमारे ३० प्रवाशांना घेऊन जाऊ शकते. तसेच, कमी सीट्स असलेला बिझनेस-क्लास पर्याय देखील उपलब्ध आहे. या बोटीची रेंज सुमारे ४० नॉटिकल मैल (अंदाजे ७५ किमी) आहे आणि ती ३० नॉट्स (सुमारे ५५ किमी/तास) इतक्या कमाल वेगाने धावू शकते. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आयलंड असा आत्ता वापरात असणाऱ्या फेरीने प्रवास केला. आजच्या फेरीच्या तुलनेत आमची फेरी अधिक वेगवान असेल.(Candela P-12 Electric Hydrofoil Boat Mumbai)
 
मुंबईच्या जलवाहतुकीला नवी दिशा?
 
मुंबई आणि आसपासच्या किनारपट्टी भागांमधील जलवाहतूक अधिक वेगवान, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल नौकांचा वापर केला जाईल. मुंबई-मांडवा, मुंबई-अलिबाग यांसारख्या मार्गांवर भविष्यात अशा तंत्रज्ञानाचा उपयोग होण्याची शक्यता आहे. मात्र, नियमित प्रवासी सेवा सुरू करण्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.(Candela P-12 Electric Hydrofoil Boat Mumbai)
 
भारताच्या शाश्वत सागरी प्रवासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा! : नितेश राणे
 
स्वीडनमधून आयात करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या पूर्णपणे इलेक्ट्रिक ‘कॅन्डेला पी-१२’ हायड्रोफॉइल नौकेच्या महाराष्ट्रात यशस्वी चाचण्या सुरू आहेत. जागतिक दर्जाचे सागरी तंत्रज्ञान भारतात आणण्याच्या महाराष्ट्र सागरी मंडळाच्या प्रयत्नांचे हे महत्त्वपूर्ण उदाहरण असून शाश्वत जलवाहतुकीच्या क्षेत्रात महाराष्ट्राला अग्रस्थानी नेण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.(Candela P-12 Electric Hydrofoil Boat Mumbai)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर